अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 04:46 PM2024-09-18T16:46:58+5:302024-09-18T16:49:10+5:30

Ayodhya Ram Mandir News: ७० एकरांवर विकसित होत असलेल्या राम मंदिर संकुलात एकूण १८ मंदिरे बांधली जाणार आहेत. या सर्व प्रकल्पांच्या उभारणीस ४ हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे.

2500 crore spent on ram mandir in ayodhya so far government likely to get 400 crores of gst | अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!

अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!

Ayodhya Ram Mandir News: समाजाच्या सहकार्याने राम मंदिराच्या परिसरातील बांधकाम सुरू आहे. दररोज सुमारे दोन लाख भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावे, अशा पद्धतीने मंदिराची व्यवस्था करण्यात येत आहे. वृद्ध, ज्येष्ठ तसेच दिव्यांग भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ आधार कार्ड दखवल्यावर ट्रस्टकडून व्हीलचेअर मोफत दिली जाते. दैनंदिन पासची व्यवस्था आहे. सुलभ दर्शनासाठी पासची सोय आहे. सामान ठेवण्यासाठी लॉकर्स बनवण्यात आले आहेत, अशी माहिती श्रीराम जन्मभूमि ट्रस्टचे चंपत राय यांनी दिली. 

पुढे बोलताना चंपत राय म्हणाले की, सुमारे ७० एकरांवर विकसित होत असलेल्या राम मंदिर संकुलात एकूण १८ मंदिरे बांधली जाणार आहेत. यामध्ये महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी अगस्त्य, माता भगवती, निषादराज, अहिल्या, शबरी, तुलसीदास आदींच्या मंदिरांचा समावेश असणार आहे. तसेच याशिवाय संग्रहालय, ट्रस्ट ऑफिस आणि गेस्ट हाऊस बांधण्यात येणार आहे. आम्ही १०० टक्के कर भरणार आहोत. सरकारला भरल्या जाणाऱ्या करात एक रुपयाही कपात केली जाणार नाही, अशी महत्त्वाची माहिती चंपत राय यांनी दिली. 

अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च

राम मंदिरासह संकुलात सुरू असलेल्या बांधकामांवर आतापर्यंत २५०० कोटींहून अधिक खर्च झाला आहे. मंदिरासह सर्व प्रकल्पांच्या बांधकामाची अंतिम मुदत जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे. बांधकामाच्या कामातून सरकारला सुमारे ४०० कोटी रुपयांचा जीएसटी मिळेल, असा विश्वास राम मंदिर ट्रस्टला आहे.

दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिराच्या उभारणीच्या कामातून जीएसटीच्या स्वरूपात सुमारे ४०० कोटी रुपये मिळतील. मंदिराच्या उभारणीतून आतापर्यंत सरकारला सुमारे १६६ कोटी रुपयांचा जीएसटी मिळाला आहे. मात्र, प्रत्यक्ष करवसुलीचा आकडा बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच कळेल. राम मंदिरासह सर्व प्रकल्पांच्या उभारणीसाठी सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे.
 

Web Title: 2500 crore spent on ram mandir in ayodhya so far government likely to get 400 crores of gst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.