251 रुपयात स्मार्ट फोन्सचा घोटाळा, कंपनीच्या संचालकाला अटक
By admin | Published: February 24, 2017 10:37 AM2017-02-24T10:37:14+5:302017-02-24T10:39:25+5:30
251 रुपयात स्मार्ट फोन देण्याचा दावा करणारी रिंगिंग बेल कंपनी घोटाळयाच्या चक्रव्यूहात फसली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नोएडा, दि. 24 - 251 रुपयात स्मार्ट फोन देण्याचा दावा करणारी रिंगिंग बेल कंपनी घोटाळयाच्या चक्रव्यूहात फसली आहे. पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित गोएलला अटक केली आहे. कंपनीने लोकांकडून फोनचे पैसे घेतले पण अद्यापी फोन ग्राहकांच्या हाती पडले नसल्याचा कंपनीवर आरोप आहे.
गाझियाबादच्या सिंहानी गेट पोलिस स्टेशनमध्ये कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीने स्वस्तात मोबाईल द्यायचा करार केला पण ना मोबाईल मिळाला, ना पैसे.
पोलिस मोहित गोएलची चौकशी करत आहेत. रिंगिंग बेलने स्वस्तात 251 रुपयात स्मार्ट फोन देण्याची जाहीरात केल्यानंतर वेबसाईटवर 7 कोटी लोकांनी फोन खरेदीसाठी रजिस्ट्रेशन केले होते.