२५१ लंका सर्व बाद , सामना जिंकण्यात रोहितचा सिंहाचा वाटा

By admin | Published: November 13, 2014 09:33 PM2014-11-13T21:33:23+5:302014-11-13T21:51:18+5:30

भारताने ४०५ धावांचे दिलेले आव्हान लंकेला झेलता आले नाही. लंकेचे सर्व खेळाडू २५१ वर बाद झाले

251 Sri Lanka all-rounder, Rohit's lucrative contribution to win the match | २५१ लंका सर्व बाद , सामना जिंकण्यात रोहितचा सिंहाचा वाटा

२५१ लंका सर्व बाद , सामना जिंकण्यात रोहितचा सिंहाचा वाटा

Next

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. १३ - भारताने ४०५ धावांचे दिलेले आव्हान लंकेला झेलता आले नाही. लंकेचे सर्व खेळाडू २५१ वर बाद झाले असून, लंकेच्या अँजेलो मॅथ्यू , थिरमाने व दिलशान यांनी चांगली फलंदाजी करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतू भारतीय गोलंदाजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. नाणेफेक जिंकत भाराताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता अजिंक्य रहाणे हा सलामी वीर अवघ्या २८ धावांत तंबूत परतल्याने पुढे सामन्याचं काय होणार, असा प्रश्न  क्रिकेट रसिकांना पडला होता. परंतू रोहित शर्माने १७३ चेंडूत २६४ धावा करत सामना जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. रोहितच्या नावे क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला. त्यामुळे आजचा सामना विशेष लक्षात राहण्यासारखा होता. या सामन्या करता रोहित शर्माला जगमोहन दालमिया यांच्याहस्ते २ लाख ६४ हजार रुपयांचा एक धनादेश आणि एक लाखाचे तीन धनादेश बक्षिस म्हणून मिळाले. तसेच सामना वीर म्हणून रोहित शर्माला गौरवण्यात आले. शर्मा व्यतिरिक्त विराट कोहलीची फलंदाजी उल्लेखनीय राहिली. स्टुअर्ट बिन्नीच्याच गोलंदाजीवर सुरेश रैना ने दिलशान आणि चांदिमल यांचे झेल घेत त्यांना तंबूत पाठवले. धवल कुलकर्णीने चार गडी बाद करत अर्धासंघ तंबूत पाठवण्यास मोलाचे सहकार्य केले. 

Web Title: 251 Sri Lanka all-rounder, Rohit's lucrative contribution to win the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.