थकबाकीदारांच्या २६ मालमत्ता जप्त
By admin | Published: September 2, 2015 11:31 PM2015-09-02T23:31:50+5:302015-09-02T23:31:50+5:30
Next
>हनुमाननगर झोनची कारवाई : वॉरंट बजावून २.४८ लाखाची वसुलीनागपूर : महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. नेहरूनगर झोनच्या विभागीय कार्यालयाने थकबाकीदारांना वॉरंट बजावून बुधवारी २६ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली. थकबाकी वसुलीसाठी झोन कार्यालयाच्या वॉरंट पथकाने वसुलीसाठी २६ जणांना वॉरंट बजावले. मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून. २.४८ लाखाची वसुली केली. मालमत्ता जप्त करण्यात आलेल्यांची नावे अशी, श्यामराव तलवारे,वामनराव बनाईत, राजू शिर्दे, इंदूबाई भोगाडे, मनोहर भोगाडे, सुलोचना कापसे, विजय कापसे, सूरज कावडकर, पुरुषोत्तम बनारसे, प्रभाकर कडू, विश्वनाथ साठवणे, उषा इंगळे, राजेश दहिकर, माणिकरराव काटे, कांतीलाल चरडे, मीनाक्षी दुरुपकर, रहमानखान बिस्मील्लहा, ममता शाहू, ज्ञानेश्वर बोलके, विठ्ठल तिवाडे, आनंदराव चिंचघरे आदींचा समावेश आहे. मालमत्ता जप्त करण्यात आलेले व वॉरंट बजावण्यात आलेल्या मालमत्ता धारकांकडे ७ लाख ५५ हजारांची थकबाकी आहे. यातील काहींनी थकबाकीची रक्कम भरली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता बाबत कोणत्याही स्वरुपाचे खरेदी - विक्रीचे व्यवहार करू नये असे दुय्यम निबंधक कार्यालयाला कळविण्यात आले आहे. संबंधित मालमत्ता धारकांनी थकबाकी न भरल्यास लिलाव करण्याचा इशारा झोनचे उपायुक्त महेश मोरोणे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)