धक्कादायक! दिल्लीत एकाच कुटुंबातील 26 जणांना कोरोनाची लागण, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 08:49 PM2020-04-18T20:49:13+5:302020-04-18T21:06:14+5:30
कोरोन व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तरीही लोक गल्लीत फिरताना अथवा शेजारी एकमेकांच्या घरी जाताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : कोरोन व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ज्या भागात अधिक कोरोनाबाधित आहेत त्या भागाला हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात येत आहे. मात्र, असे असतानाही लोक गल्लीत फिरताना अथवा शेजारी एकमेकांच्या घरी जाताना दिसत आहेत. याच कारणामुळे दिल्लीत एकाच कुटुंबातील एक-दोन नव्हे तर तब्बल 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आहे.
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, येथील जहांगीर पुरी कंटेनमेंट झोनमध्ये एकाच कुटुंबातील तब्बल 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. येथे एकाच कुटुंबाची अनेक घरे आहेत. कंटेनमेंट झोन असूनही या कुटुंबातील सर्व लोक एकमेकांच्या घरी जात होते. यामुळे कुण्या एकाच्या संक्रमित असल्यानेही 26 जण कोरोनाच्या चपाट्यात आले.
कल जहांगीरपुरी में एक कंटेनमेंट जोन में एक ही परिवार के 26 लोग #COVID19 से ग्रस्त पाए गए हैं :दिल्ली CM अरविंद केजरीवाल pic.twitter.com/uChZQqYsCo
— ANI_HindiNews (@AHindinews) April 18, 2020
संपूर्ण राज्यात 71 कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. असे असतानाही काही लोक कंटेनमेंट झोनमध्ये, काही गल्ल्यांमध्ये, तर काही एकमेकांच्या घरी ये-जा करत असतात, असेही केजरीवाल म्हणाले. त्यांनी कोलांना लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्याचेही आवाहन केले आहे. दिल्लीत आतापर्यंत 1750 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
केजरीवाल म्हणाले, 'आपल्या जीवाची चिंता आम्हाला आहे. आपल्याला कोरोना होईल किंवा नाही, हे आपल्यावर अवलंबून आहे. तुम्हीच तुम्हाला सुरक्षित ठेवाल तर कोरोना होणार नाही आणि ढील द्याल तर कोरोना होईल. जर कुणाला वाटत असेल की मला कोरोना होणार नाही, तर हे चूक आहे. ना हा कुण्या मंत्र्याला सोडतो, ना कुण्या चपराशाला. कुण्याही धर्माचे अथवा जातीचे लोक कोरोनाच्या चपाट्यात येऊ शकतात.