अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यास देणाऱ्या 26 पालकांची कारावासात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 02:51 PM2018-04-27T14:51:56+5:302018-04-27T14:51:56+5:30
लहान मुलांनी स्वयंचलित वाहन चालवणे धोकादायक आहे, हे माहित असतानाही पालक लहान मुलांना वाहन चालवण्यास देतात. अशा पालकाना लगाम घालण्यासाठी त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलून...
हैदराबाद - घरातील दुचाकी, चारचाकी वाहने अल्पवयीन मुलांनी चालवणे आणि पालकांनी त्यांना मुकसंमती देणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे. लहान मुलांनी स्वयंचलित वाहन चालवणे धोकादायक आहे, हे माहित असतानाही पालक लहान मुलांना वाहन चालवण्यास देतात. आता अशा पालकाना लगाम घालण्यासाठी हैदराबादमधील वाहतूक पोलिसांना अशा पालकाना लगाम घालण्यासाठीली असून, लहान मुलांकडे स्वयंचलित वाहने सोपवणाऱ्या 26 पालकांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
याबाबत माहिती देताना हैदराबाद वाहतूक पोलीस खात्याचे जॉइंट कमिशन अनिल कुमार म्हणाले, लहान मुलांकडे वाहन चालवण्यास दिल्याच्या आरोपाखाली मार्च महिन्यात न्यायालयाने 20 पालकांची रवानगी कारावासात केली आहे. वाहतूक नियमांबाबत जागृती व्हावी यासाठी हैदराबाद पोलीस सध्या उपदेशन वर्ग आयोजित करत आहे. तसेच लहान मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत.
याआधी फेब्रुवारी महिन्यात अशी 1079 प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण 45 पालकांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. तसेच प्रत्येक पालकाला 500 रुपये दंड ठोठावला होता. अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात येत आहे. 2017 साली ज्यामध्ये अल्पवयीन मुले वाहन चालवत असल्याची 130 प्रकरणे समोर आली होती.
प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार,पबमधून परतताना द्वितीय वर्षात शिकत असलेल्या इंजिनियरिंग काँलेजच्या 4 विद्यार्थिनींनी बेदरकारपणे वाहन चालवल्याने झालेल्या अपघातात 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते त्यानंतर या मुली दारू पिऊन गाडी चालवत होता, असा आरोप मृत व्यक्तीच्या मुलाने केला होता.