धक्कादायक! गरबा खेळत असताना 26 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू, झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 04:01 PM2023-10-06T16:01:46+5:302023-10-06T16:02:26+5:30
गरबा क्लासमध्ये सरावासाठी गेलेल्या 26 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या घटनेने लोकांना मोठा धक्का बसला आहे.
तरुणांमध्ये हार्ट अटॅकच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणेच गुजरातही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये हार्ट अटॅकमुळे तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री गरबा क्लासमध्ये सरावासाठी गेलेल्या 26 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या घटनेने लोकांना मोठा धक्का बसला आहे. परिसरात खळबळ उडाली आहे.
एलपी सवनी रोडवर असलेल्या सूरत महानगरपालिकेच्या कम्युनिटी हॉलमध्ये गरबा क्लास चालवले जातात. राज धर्मेश मोदी नावाचा तरुणही तेथे पोहोचला होता. समोर आलेल्या त्याच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये तो काळा कुर्ता आणि कोट घालून गरबा खेळत असल्याचं दिसून येतं. यावेळी छातीत दुखू लागल्याने तो शेजारी ठेवलेल्या खुर्चीवर बसला.
काही वेळात तो बेशुद्ध झाला आणि खुर्चीवरून खाली पडला. उपस्थित लोकांनी त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तो एकुलता एक मुलगा होता. काही दिवसांनी तो उच्च शिक्षणासाठी लंडनला जाणार होता. पण त्याचं हे स्वप्न आता अपूर्ण राहिलं. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तो बुधवारी रात्री गरबा सरावासाठी गेला होता. तेथे हार्ट अटॅकने मृत्यू झाला.
नातेवाईकांनी सांगितले की, तो जानेवारीमध्ये यूकेला जाणार आहे. त्यासाठी तयारी सुरू होती. तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सूरतच्या गोडादरा भागातील एका शाळेत शिकत असताना एका 13 वर्षीय मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.