सेन्सेक्सची 26,000 वर ङोप
By admin | Published: July 8, 2014 12:16 AM2014-07-08T00:16:28+5:302014-07-08T00:16:28+5:30
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी प्रथमच 26,क्क्क्च्या अंकाला गवसणी घातली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला.
Next
मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी प्रथमच 26,क्क्क्च्या अंकाला गवसणी घातली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. केंद्रीय अर्थसंकल्पात बाजाराला चालना देणा:या घोषणांच्या अपेक्षेने बाजाराने ही ऐतिहासिक उसळी घेतली आहे.
बाजार विश्लेषकांनी सांगितले की, इन्फोसिसच्या नेतृत्वाखालील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरमधील तेजीमुळे बाजार धारणोला बळ मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ऐतिहासिक 26,क्क्क् अंकाच्या वर उघडून एकावेळी 26,123.55 अंकाच्या उंचीवर पोहोचला. दिवसअखेर सेन्सेक्स 138.क्2 अंक अथवा क्.53 टक्क्यांच्या तेजीसह 26,100.क्8 अंकावर बंद झाला. यापूर्वी शुक्रवारी सेन्सेक्स 25,962.क्6 अंकाच्या विक्रमी पातळीवर बंद झाला होता.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 35.55 अंक अथवा क्.46 अंकांच्या तेजीसह 7,787.15 अंकाच्या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. शुक्रवारी निफ्टी 7,751.6क् अंकाच्या विक्रमी पातळीवर बंद झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टी 7,792 अंकाच्या नव्या विक्रमी पातळीवर ङोपावला होता.
एचएसबीसीच्या एका सव्रेक्षणानुसार, भारताच्या बांधकाम आणि सेवा क्षेत्रचा वृद्धीदर जूनमध्ये चीनपेक्षा चांगला राहिला. याचाही बाजारधारणोवर सकारात्मक परिणाम झाला.
दिल्ली शेअर बाजारातील ब्रोकर दीपक पाहवा यांनी सांगितले की, अर्थसंकल्पापूर्व तेजीने बाजार नव्या उंचीवर पोहोचला. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल यादिशेने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून अर्थसंकल्पात घोषणा केल्या जातील, अशी बाजाराला अपेक्षा आहे. या पाश्र्वभूमीवर गुंतवणूक अर्थसंकल्पापूर्वी मोठय़ा कंपन्यांच्या शेअरची मागी करीत आहेत. आयटी, फार्मा, वीज आणि वाहन क्षेत्रतील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठय़ा प्रमाणात खरेदी दिसून आली. त्यामुळे या क्षेत्रतील शेअर्स कोसळले. या उलट बँकिंग आणि रिफायनरी या क्षेत्रतील कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा मारा दिसून आला. त्यामुळे काही क्षेत्रतील कंपन्यांचे शेअर्स घसरले.
आशियाई बाजारात चीन, सिंगापूर आणि तैवान येथील शेअर बाजार 0.03 टक्के ते 0.59 टक्के तेजीत राहिले. हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया येथील शेअर बाजार मात्र 0.02 टक्के ते 0.37 टक्के मंदीत राहिले. युरोपीय बाजारात सुरुवातीच्या काही तासांत नफा वसुलीचा कल दिसून आला. त्यामुळे हे बाजारही मंदीत होते. (प्रतिनिधी)
4शुक्रवारी विदेशी संस्थांनी 943.19 कोटी रुपयांची शेअर्स खरेदी केली. बाजाराच्या नजरा आता रेल्वेच्या अर्थसंकल्पाकडे आहेत.
4सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 30 कंपन्यांपैकी टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.59 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. इन्फोसिस 3.23 टक्के, टीसीएस 3.06 टक्के, टाटा मोटर्स 2.20 टक्के, डॉ. रेड्डीज लॅब 1.95 टक्के, विप्रो 1.86 टक्के, भारती एअरटेल 1.80 टक्के आणि एनटीपीसी 1.73 टक्के वाढीसह बंद झाले.
4सनफार्मा आणि हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांनाही तेजीचा लाभ मिळाला. या उलट एचडीएफसीचा शेअर सर्वाधिक 1.90 टक्क्यांनी कोसळला. त्यापाठोपाठ ओएजीसी 1.60 टक्के, गेल इंडिया 1.08 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.79 टक्के अशी घसरण पाहायला मिळाली.