२६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती शक्य
By admin | Published: September 22, 2015 10:38 PM2015-09-22T22:38:56+5:302015-09-22T22:38:56+5:30
मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे उलटली असताना लष्कर-ए-तोयबाने भारताच्या अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती घडविण्याचा डाव
नवी दिल्ली : मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सात वर्षे उलटली असताना लष्कर-ए-तोयबाने भारताच्या अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती घडविण्याचा डाव रचला असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुप्तचर यंत्रणेने अनेक सुरक्षा संस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषत: ताज्या अलर्टनंतर सागरी सुरक्षा आणखी वाढविण्यात आली आहे.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि नौदलाने लष्करची नौदल शाखा पुनरुज्जीवित करण्यासाठी सक्रिय मदत देणे सुरू केले आहे. अलीकडेच अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांकडून लष्करने कशाप्रकारे हल्ल्यांची योजना आखली त्याची माहिती मिळाली आहे. मोहम्मद नावेद याकूब या पाकिस्तानी अतिरेक्याला अलीकडेच उधमपूर हल्ल्याच्या वेळी अटक करण्यात आली. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहिमेत सज्जाद अहमद या आणखी एका पाकिस्तानी अतिरेक्याला आॅगस्टमध्ये अटक केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)