२६/११ सारखा कट तटरक्षक दलाने उधळला, ३ बोटींमधून AK47 रायफल, काडतुसं, ३००० कोटींचे ड्रग्ज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 09:12 PM2021-03-25T21:12:10+5:302021-03-25T21:27:29+5:30
26/11 plot foiled by Coast Guard : लक्षद्विपजवळील मिनीकॉस येथे ही कारवाई करण्यात आली. ३०० किलो हिरोईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे.
तटरक्षक दलाच्या वरळील मुख्यालय असलेल्या पश्चिम ताफ्यातील युद्धनौकेने अरबी समुद्रात गुरुवारी मोठी कारवाई केली तटरक्षक दलाने अरबी समुद्रात कारवाई करून मोठ्या घातपाताचा डाव उधळला संशयित नौकेला घेराव घालून जवळपास ३००० कोटी रुपयांचा अमली पदार्थाचा साठा आणि पाच AK47 रायफल आणि १ हजार जिवंत काडतुसे जप्त केली. लक्षद्विपजवळील मिनीकॉस येथे ही कारवाई करण्यात आली. ३०० किलो हिरोईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. त्यामुळे २६/११ हा मुंबईवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला देखील भारतीय बोटी ताब्यात घेऊन दहशतवाद्यांना मुंबईत शिरकाव केला होता. हा प्रकार देखील तसाच आहे का? याबाबत तपास सुरु आहे.
On 18 March, ICG intercepted 3 suspicious boats off Minicoy Islands. On rummaging of boats, high-grade 300kg Heroin and 5 AK-47 rifles with 1000 live rounds were recovered from Sri Lankan fishing boat Ravihansi: Indian Coast Guard pic.twitter.com/PjFmkIAtOo
— ANI (@ANI) March 25, 2021
तटरक्षक दलाची मोठी कामगिरी, ३ बोटींवर कारवाई करत ५००० कोटींचे ड्रग्ज केले जप्त pic.twitter.com/U42Qo7jyqO
— Lokmat (@MiLOKMAT) March 25, 2021
अमली पदार्थाचा साठा, ५ रायफली आणि काडतुसे घेऊन भारतीय किनारपट्टीवर येत असलेल्या नौकेला घेराव घालून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तटरक्षक दलाकडून संशयित नौकेला घेरून त्याची तपासणी करण्यात आला. त्यावेळी नौकेमध्ये तब्बल ३००० कोटी रुपयांचे ३०० किलो अमली पदार्थ सापडले याशिवाय पाच एके ४७ रायफल तसेच १ हजार जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. समुद्री संरक्षण मोहिमेंतर्गत समुद्री तसेच हवाई समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय येथे ही थरारक कारवाई करण्यात आली.
तटरक्षक दलाची गस्ती नौका गस्त घालत असताना तीन मच्छिमार नौका संशयास्पद स्थितीत दिसून आल्याची माहिती मिळाली. विमानाने टेहळणी करून संबंधित नौकांबद्दल अधिक माहिती मिळवून नेमके ठिकाण गस्तीवर असलेल्या नौकेला कळवण्यात आले. त्यानुसार गस्ती नौकेने या तिन्ही मच्छिमार नौकांना घेराव घातला. तीनपैकी रवीहंसी ही श्रीलंकन मच्छिमार बोट अमली पदार्थ व रायफल घेऊन भारतीय किनारपट्टीवर येत होती. अन्य दोन नौका तिला संरक्षण पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिन्ही नौकांसह त्यावरील १९ खलाशांना तटरक्षक दलाने ताब्यात घेत मोठ्या घातपाताचा कट उधळला आहे.