26/11 आम्हीच केला, पाकिस्तानच्या अधिका-याकडून कबुली
By admin | Published: March 6, 2017 02:44 PM2017-03-06T14:44:37+5:302017-03-06T15:07:36+5:30
मुंबईत झालेला 26/11 दहशतवादी हल्ला करण्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा हात होता अशी कबुली मोहम्मद अली दुर्रानी यांनी दिली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - मुंबईत झालेला 26/11 दहशतवादी हल्ला करण्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा हात होता अशी कबुली खुद्द पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद अली दुर्रानी यांनी दिली आहे. '26/11 सीमापार दहशतवादाचं वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण असल्याचं', मोहम्मद अली दुर्रानी बोलले आहेत. दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
यावेळी बोलताना मोहम्मद अली दुर्रानी यांनी जमात-एल-दावाचा दहशतवादी हाफिज सईदलाही चांगलंच फटकारलं आहे. 'हाफिज सईदचा काही एक उपयोग नसून त्याच्याविरोधात कारवाई करणं गरजेचं असल्याचं', दुर्रानी बोलले आहेत.
मुंबई 26/11 प्रकरणी भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा तपास करत जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करायला सांगितलं आहे. पाकिस्तानने भारताकडे 24 साक्षीदारांना जबाब नोंदवण्यासाठी पाठवण्याचा आग्रह केल्यानंतर भारताने ही नवीन मागणी केल्याचं पाकिस्तान गृहमंत्रालयाच्या अधिका-याने सांगितलं.
#WATCH: Former Pakistan NSA Mahmud Ali Durrani says 26/11 attack was carried out by terror group based in Pakistan. pic.twitter.com/cBmzSFnbK2
— ANI (@ANI_news) March 6, 2017
अधिका-याने सांगितलं आहे की, 'आम्ही पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना भारत सरकारकडून हे उत्तर आलं आहे. आम्ही केलेल्या आग्रहावर लक्ष देण्याऐवजी भारताने याप्रकरणी पुन्हा नव्याने तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसंच जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद आणि उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे लष्कर-ए-तोयबाचा कमांड जकीउर रहमान लखवी यांच्यावर खटला चालवण्याची मागणी केली आहे'.
पाकिस्तान सरकारने 30 जानेवारी रोजी हाफिज सईदसहित जमात-उद-दावाच्या चौघांना नजरकैदेत ठेवलं होतं. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या हाफिज सईदची 2009 मध्ये न्यायालयाने सुटका केली होती.