CoronaVirus News : बापरे! "या" राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 262 विद्यार्थी, 160 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह
By सायली शिर्के | Published: November 5, 2020 04:30 PM2020-11-05T16:30:33+5:302020-11-05T16:41:16+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने 83 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील एकूण कोरोनागस्तांची संख्या 83,64,086 वर पोहोचली असून कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 1,24,315 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 2 नोव्हेंबरपासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्या आहेत. पण कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणं चांगलंच महागात पडलं आहे. जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "आंध्र प्रदेशमध्ये 2 नोव्हेंबर रोजी 9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांत जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे."
As many as 262 students, about 160 teachers test positive in Andhra Pradesh during past three days after schools reopened on November 2 for class 9 and 10 students: senior official
— Press Trust of India (@PTI_News) November 5, 2020
शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे. याआधी कर्नाटकमध्येही परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. कर्नाटक बोर्डाने काही दिवसांपूर्वी SSLC च्या परीक्षा घेतल्या. जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा दिलेल्या तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती.
काही महिन्यांपूर्वी इस्त्राईलच्या शाळेतील 261 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची घटना समोर आली होती. इस्त्राईलने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय देशाला महागात पडला. शाळेतील तब्बल 261 मुलं आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. तर जवळपास 6800 मुलांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. इस्त्राईलच्या शाळेतील 261 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 261 कोरोना संक्रमितांमध्ये 250 मुलांचा समावेश होता. यानंतर 6800 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं.
CoronaVirus News : घरबसल्या 100 रुग्ण झाले ठणठणीत, कोरोनावर केली मात; आरोग्य विभागाने दिली महत्त्वाची माहितीhttps://t.co/guzmFWBizl#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) October 31, 2020
CoronaVirus News : लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना ओळखणं सोपं होणार, जाणून घ्या कसं?https://t.co/wlrt7xjKEL#coronavirus#Corona#Mobile#technology
— Lokmat (@MiLOKMAT) October 31, 2020