२७... नरखेड
By Admin | Published: December 27, 2014 06:56 PM2014-12-27T18:56:03+5:302014-12-27T18:56:03+5:30
(फोटो)
(फ ोटो)नरखेड येथे गोमाता शोभायात्रानरखेड : स्थानिक अमृत गोरक्षण समिती आणि मानवाधिकार ॲक्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने नरखेड शहरात गोमाता शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या समारोपानंतर गोसभेचेही आयोजन करण्यात आले होते.स्थानिक श्रीकृष्ण मंदिरातून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत ही शोभायात्रा सायंकाळी महात्मा गांधी चौकात पोहोचली. तिथे समारोप करण्यात आला. त्यानंतर गांधी चौकातच गोसभेला सुरुवात झाली. या सभेला धनराज काळे, रामचंद्र काळबांडे, रजिया सुलतान, भदंत धम्मसेन महाथेरो, गोपाळकृष्ण गोरक्षणचे चंदू कडू, हरीश खंडेलवाल, मुन्ना शर्मा, विनोद मुंदडा, जयंत गुल्हाने, सतीश अकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नरखेड शहरात जनावरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला होता. त्या ट्रकमधील मरणासन्न गाईंची काळजी घेण्यात आली. या गाईंनाही या शोभायात्रेत सहभागी करण्यात आले होते. क्रेनवर ठेवलेली गोमातेची प्रतिमा लक्ष वेधून घेत होती. या शोभायात्रेत तालुक्यातील शेमडा, मन्नाथखेडी, सावरगाव, मोवाड, येणीकोणी यासह अन्य ठिकाणचे गुराखी, दिंडी व लेझीम पथक सहभागी झाले होते. स्थानिक क्रांतिज्योती विद्यालयाच्या लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले होते. यावेळी गुराखी दिंडी पथकातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वितेसाठी गजानन ठाकरे, योगेश मांडवकर, नितीन कडू, नीरज झाडे, विनोद वेरुळकर, गौरव वैद्य, नीलेश चरडे, प्रेमराज बालपांडे, प्रमोद रेवतकर, नीलेश भोयर, रामेश्वर खुरसंगे यांच्यासह पवनसूत व्यायाम शाळा, जयश्रीराम व्यायाम शाळा व समर्थ व्यायाम शाळेच्या सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)***