भाजपाच्या काळात 27 रेल्वे दुर्घटनेत 259 प्रवाशांचा मृत्यू, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 02:25 PM2017-08-20T14:25:44+5:302017-08-20T14:27:04+5:30
काल उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 10 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक जखमी झाले.
नवी दिल्ली, दि. 20 - काल उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 10 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक जखमी झाले. काँग्रेसनं या रेल्वे दुर्घटनेवरुन केंद्र सरकाला अडचणीत पकडले आहे. काँग्रेसनं हाच मुद्दा पकडून भाजपावर घणाघाती टीका केली आहे. 2014 ला भाजपा सरकार सतेत आल्यापासून आतापर्यंत 27वी रेल्वे दुर्घटना झाली आहे. भाजपाने रेल्वे दुर्घटनेचा रेकॉर्ड बनवल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. 2014 पासून झालेल्या 27 दुर्घटनेत आतापर्यंत 259 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 899 जण जखमी झाल्याची माहिती काँग्रेसनं दिली आहे. काँग्रेस प्रवाक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत रेल्वे दुर्घटनेचा चांगलाच समाचार घेतला. रेल्वे दुर्घटना होत आहेत आणि लोकांचा जीव जात आहे, हे सरकार कधी जाणार असा प्रश्नही ट्विटद्वारे उपस्थित केला.
काँग्रेस प्रवाक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, उत्कल एक्स्प्रेस दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियाप्रति शोक संवेदना व्यक्त करतो. मृत पावलेल्या प्रवाशांच्या आत्म्याला शांती लाभो. या अपघातात अनेक निर्दोषांचा मृत्यू झाला. रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुरजेवालाने माध्यमांशी बोलातान सांगितले की, या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियाना सरकार आर्थिक मदत करेल पण पैशांनी त्यांचा जीव परत येणार नाही. सतत घडणाऱ्या या रेल्वे अपघातानां रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे.
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येतील. तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
उत्कल एक्स्प्रेस अपघातप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम '३०४ ए' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे रुळावर काम सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे, उद्यापासून सुरक्षा आयुक्त घटनेची चौकशी करणार आहे. आज रात्री १० वाजेपर्यंत यांनी स्पष्ट केलं आहे.