Video: 27 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींना दहशतवाद्यांनी दिली होती 'ही' धमकी! अखेर बदला घेतलाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 10:56 AM2019-08-06T10:56:53+5:302019-08-06T10:58:07+5:30

दहशतवादी भारताचा तिरंगा जमिनीवर फेकून देत असे, अनेक भागात तिरंगा जाळण्यात येत होता

27 years ago Narendra Modi was given a 'threat' by terrorists! | Video: 27 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींना दहशतवाद्यांनी दिली होती 'ही' धमकी! अखेर बदला घेतलाच

Video: 27 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींना दहशतवाद्यांनी दिली होती 'ही' धमकी! अखेर बदला घेतलाच

Next

नवी दिल्ली - सोमवारी मोदी सरकारने काश्मीरातून कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे देशभरातून नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कलम 370 हटविल्यामुळे जम्मू काश्मीरला केंद्रशासित राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे काश्मीरमधील लोकांचे दुहेरी नागरिकत्व संपुष्टात आलं आहे. राज्यात वेगळं निशाण फडकवता येणार नाही. कलम 370 हटविणे हे भाजपाच्या जाहीरनाम्यातील आश्वासन होतं. तसेच वर्षोनुवर्ष ही मागणी भाजपाने लावून धरली होती. 

70 वर्षापूर्वी करण्यात आलेली चूक मोदींनी दुरुस्त केली असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. या निर्णयानंतर नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत लाल चौकात तिरंगा फडकवताना नरेंद्र मोदी दिसत आहेत. हा तिरंगा फडकवताना मोदींनी दहशतवाद्यांना आव्हान दिलं होतं. 

या व्हिडीओमध्ये मोदी म्हणतात की, मला आठवतंय की, 1992 मध्ये तिरंगा फडकविण्यासाठी मी काश्मीरला गेलो होतो. त्यावेळी दहशतवाद मोठ्या प्रमाणात सुरु होता. दहशतवादी भारताचा तिरंगा जमिनीवर फेकून देत असे, अनेक भागात तिरंगा जाळण्यात येत होता. देशाच्या ध्वजाचा अपमान केला जात होता. तिरंगा ध्वजाने बूट साफ केले जात होते. ही सगळं दृश्य पाहून मनात आग भडकत होती. तेव्हा आम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत यात्रा काढण्याचं ठरवलं. 26 जानेवारीला लालचौकात तिरंगा फडकविणार हे निश्चित झालं.

दहशतवाद्यांना हे कळाल्यानंतर श्रीनगरच्या प्रत्येक भिंतीवर पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यावर लिहिलं होतं की, जर कोणी आपल्या आईचं दूध प्यायलं असेल तर 26 जानेवारीला लाल चौकात तिरंगा फडकवून पुन्हा जिवंत जाऊन दाखवावं अशी धमकी दिली होती.
त्यावेळी मी हैदराबादच्या सभेत मी 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता श्रीनगरमधील लाल चौकात येणार आहे. मी बुलेटप्रूफ जॅकेट घालणार नाही किंवा बुलेटप्रुफ कारमधून येणार नाही. माझ्या हातात तिरंगा असेल. फैसला 26 जानेवारीलाच होईल असं सांगितलं. त्यानंतर मी ठरलेल्या दिवशी, दिलेल्या वेळेत लाल चौकात जाऊन तिरंगा फडकविला असं नरेंद्र मोदींनी सांगितले.  
 



 

Web Title: 27 years ago Narendra Modi was given a 'threat' by terrorists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.