२८... भिवापूर... कार्ड
By admin | Published: December 28, 2014 11:40 PM2014-12-28T23:40:34+5:302014-12-28T23:40:34+5:30
दोन तासात २०० रेशनकार्ड तयार?
Next
द न तासात २०० रेशनकार्ड तयार?भिवापूर तहसील कार्यालय : वृद्धाने व्यक्त केला रोष, सहा महिन्यांपासून सुरू होत्या हेलपाट्याभिवापूर : सामान्य नागरिकांच्या दृष्टीने रेशनकार्डला विशेष महत्त्व आहे. रेशनकार्डासाठी खेड्यापाड्यातील ग्रामस्थ सहा महिन्यांपासून भिवापूर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवीत होते. त्यातच शुक्रवारी एका वृद्ध व्यक्तीने तहसील कार्यालयात चांगलाच रोष व्यक्त केला. त्यामुळे कार्यालयात धूळ खात पडलेल्या रेशनकार्डवर अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली. पाहता पाहता सहा महिन्यांपासून केवळ स्वाक्षरीसाठी अडलेले २०० च्यावर रेशनकार्ड अवघ्या दोन तासांत तयार झाले. सामान्य नागरिकांना शासकीय स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्याची खरेदी करण्यासह अन्य महत्त्वाच्या कामासाठी रेशनकार्डची गरज भासते. त्यामुळे अनेकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भिवापूर तहसील कार्यालयात सादर केला. दरम्यान, रेशनकार्ड मिळविण्यासाठी ग्रामस्थांच्या तहसील कार्यालयात हेलपाट्या मारणे सुरू झाले. प्रत्येक वेळी तहसीलदारांची स्वाक्षरी झाली नसल्याचे कारण सांगून संबंधित कर्मचारी ग्रामस्थांची बोळवण करीत होते. वारंवार कार्यालयातून रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण होणे स्वाभाविक होते. शुक्रवारी भिवापूरचा आठवडी बाजार असल्याने बहुतांश ग्रामस्थ बाजाराच्या निमित्ताने भिवापुुरात आले होते. सदर ग्रामस्थ रेशनकार्डची चौकशी करण्यासाठी तहसील कार्यालयात पोहोचले. ग्रामस्थांनी कर्मचाऱ्याकडे रेशनकार्डविषयी विचारणा केली असता, कर्मचाऱ्यांनी नेहमीचे उत्तर देत ग्रामस्थांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. सदर उत्तर ऐकून बेसूर येथील एका वृद्ध व्यक्तीने त्या कर्मचाऱ्याला जोरजोरात शिव्यांची लाखोळी वाहायला सुरुवात केली. प्रकरण एवढ्यावर थांबले नाही तर, संतापलेली वृद्ध व्यक्ती चक्क त्या कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेली. या प्रकारामुळे कर्मचारीही अवाक् झाले. अखेर त्या कर्मचाऱ्याला स्वत:च्या बचावासाठी दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या मागे लपावे लागले. सदर प्रकार कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला कळताच त्याने नायब तहसीलदारांना सदर रेशनकार्डवर स्वाक्षरी करण्यास सांगितले. त्यानंतर स्वाक्षरी झालेले कार्ड त्या वृद्ध व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आले. या कार्यालयात गेल्या सहा महिन्यांपासून तयार करण्यात आलेले रेशनकार्ड अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीविना धूळ खात पडले होते. त्यावर स्वाक्षरी करण्याचे औदार्य अधिकाऱ्यांनी दाखवले नव्हते. त्यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांची फजिती तर दुसरीकडे ग्रामस्थांची अडचण, अशी दुहेरी समस्या निर्माण झाली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांचा तिढा अद्याप कायम आहे. (तालुका प्रतिनिधी)