२८... काटोल... शोभायात्रा
By Admin | Published: December 28, 2014 11:40 PM2014-12-28T23:40:32+5:302014-12-28T23:40:32+5:30
(फोटो)
(फ ोटो)शोभायात्रेने दुमदुमली काटोल नगरीकाटोल : स्थानिक बुधवारपेठेतील कांतेश्वर मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत तालुक्यातील कुकडीपांजरा येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. जिल्हा महानुभाव मंडळ, सावनेर तालुका कमिटी व श्री पंचकृष्ण महानुभाव मंडळ कुकडीपांजरा यांच्या संयुक्त विद्यमाने कुकडीपांजरा येथे महानुभाव पंथीयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तिथे १९ डिसेंबर रोजी कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काटोल शहरात शनिवारी सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बुधवारपेठेतील कांतेश्वर मंदिरातून काढण्यात आलेली ही शोभायात्रा साठेनगर, शनिमंदिर, शारदा चौक, गळपुरा, मेनरोड, तारबाजार, बसस्थानकमार्गे कुकडीपांजरा येथील कार्यक्रमस्थळी पोहोचली. यात कृष्ण-सुदामा पथक दिल्ली, मयूर घोडा पथक जबलपूर, आदिवासी पथक, पंजाबी भांगडापथक, खुमारी येथील झांज पथक, माणिकवाडा येथील दिंडी पथक, कारंजा, उपरवाही, खैरगाव, नारसिंगी, इंदरवाडा, वाडेगाव, चिचगव्हाण येथील भजन मंडळांसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रेचे काटोल शहरात पहिल्यांदाच आयोजन करण्यात आल्याची माहिती सुभाष पोहोकर, निर्मला गेडाम, वंदना लोहे, अंतमाला पोहोकर, प्रमिला भोयर, वंदना लोहे यांनी संयुक्तरीत्या दिली. (तालुका प्रतिनिधी)***