सीबीआयचे २८ अधिकारी पुरस्कृत

By Admin | Published: January 26, 2015 03:32 AM2015-01-26T03:32:05+5:302015-01-26T03:32:05+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सीबीआयच्या २८ अधिकाऱ्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले आहे.

28 officers from CBI awarded | सीबीआयचे २८ अधिकारी पुरस्कृत

सीबीआयचे २८ अधिकारी पुरस्कृत

googlenewsNext

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सीबीआयच्या २८ अधिकाऱ्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले आहे. यात २ जी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा, झारखंड राज्यसभा निवडणुकीतील घोडेबाजाराची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सीबीआयने जारी केलेल्या पत्रकानुसार ५ अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक व इतर २३ अधिकाऱ्यांची पोलीस पदकासाठी निवड झाली आहे. यादीत बोकारो पोलाद प्रकल्पातील भ्रष्टाचार व सेल नियुक्त्यांमधील घोटाळयांसह अनेक बड्या प्रकरणांचा तपास करणारे तपास संस्थेचे संयुक्त संचालक अमरेंद्रकुमार सिंग आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)


 

Web Title: 28 officers from CBI awarded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.