गज वादळाच्या तडाख्याने २८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 06:38 AM2018-11-17T06:38:28+5:302018-11-17T06:39:40+5:30
वेलांगणीमध्येही मोठे नुकसान झ्राले आहे. कडलुर व नागपट्टणम जिल्ह्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.
सालेम : गज या चक्रीवादळाने शुक्रवारी तामिळनाडूच्या नागपट्टणम जिह्याला जोरदार तडाख्यामुळे २८ जण मरण पावले. त्यांच्या वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी जाहीर केले आहे. वादळासोबत पडलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील विजेचे अनेक खांब व झाडे कोसळली आहेत. तसेच अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत.
Cyclone Gaja : असं पडलं तामिळनाडूमधील 'गज' चक्रीवादळाचं नाव
वेलांगणीमध्येही मोठे नुकसान झ्राले आहे. कडलुर व नागपट्टणम जिल्ह्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. येत्या २४ तासांत या भागात मुसळधार पाऊस सुरूच राहाण्याची शक्यता आहे. गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये व किरकोळ जखमींना २५ हजार रुपये देण्यात येणार आहे. चक्रीवादळाच्या आधी ८० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. वादळाचा कडलुर व पुडुकोट्टाई या जिल्ह्यांनाही फटका बसला आहे. (वृत्तसंस्था)