२८ टक्क्यांच्या जीएसटीतून आणखी वस्तू गळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:20 AM2018-12-14T01:20:48+5:302018-12-14T01:21:42+5:30
जीएसटीच्या २८ टक्के श्रेणीतून आणखी काही वस्तू गळण्याची शक्यता आहे.
मुंबई : जीएसटीच्या २८ टक्के श्रेणीतून आणखी काही वस्तू गळण्याची शक्यता आहे. त्या बहुतांशी बांधकामाशी संबंधित असू शकतील.
जीएसटी परिषदेच्या २२ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
जीएसटीतील २८ टक्के श्रेणीत १ जुलै २०१७ ला २२६ वस्तू होत्या. परिषदेने दीड वर्षांत यापैकी १९१ वस्तूंवरील कर कमी केला. त्यामुळे आता सर्वाधिक कराच्या या श्रेणीत फक्त ३५ वस्तू शिल्लक आहेत. त्याही आता कमी होण्याची शक्यात आहे. या ३५ वस्तूंमध्ये प्रामुख्याने
सिमेंंट, नळ फिटींग्स याप्रकारच्या वस्तू आहेत. त्यावरील कर कमी होऊ शकतो. येत्या काळात फक्त ‘लक्झरी’ वस्तू व सेवांवरच २८ टक्के कर असावा, असा परिषदेचा प्रयत्न आहे.