२८... सारांश
By admin | Published: December 28, 2014 11:40 PM2014-12-28T23:40:37+5:302014-12-28T23:40:37+5:30
लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय
Next
ल केजमुळे पाण्याचा अपव्ययनांद : स्थानिक हनुमान मंदिराजवळ ग्रामपंचायतची कूपनलिका आहे. या कूपनलिकेतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. लिकेजमुळे कूपनलिकेतील पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. आधीच गावाला एक दिवसाच्या आड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सदर लिकेज दुरुस्त करण्याची मागणी नांदवासीयांनी केली आहे.***कोहळी येथे ग्रामस्वच्छता अभियानमोहपा : नजीकच्या कोहळी येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेतली. अभियानात नीळकंठ चव्हाण, लुकेश राणे, अश्विनी वैद्य, सुरेश घोंगे, धर्मदास चनकापुरे, तुळशीराम पांडेेकर, व्यंकोजी अखंड, नरेंद्र पुरी,अतुल तुरणकर, शेषराव अखंड, संजय ठाकरे सहभागी झाले होते. ***पारशिवनी येथे रोगनिदान शिबिरपारशिवनी : स्थानिक केसरीमल पालीवाल चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी दीपक पालीवाल, राजू कडू, कमलाकर मेंघर, प्रकाश डोमकी, हर्षवर्धन निकोसे, डॉ. प्रमोद भड उपस्थित होते. यावेळी रुग्णांच्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली. ***भारतीय आदर्श विद्यालयात स्नेहसंमेलनपारशिवनी : तामसवाडी येथील भारतीय आदर्श विद्यालयात स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. याप्रसंगी श्रीराम आष्टनकर, कमलाकर मेंघर, नाना लोहकरे, सरपंच गीता लकडकर, रमेश जोध, वसंता वांढे, दादाजी सायने आदी उपस्थित होते. विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून अतिथींची मने जिंकली. ***भाजपचे सदस्य नोंदणी अभियानमौदा : भाजपच्या मौदा तालुका व शहर शाखेच्यावतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. दरम्यान, शिवाजीनगरात मिरवणूक काढण्यात आली. त्यात राजू सोमनाथे, मोरेश्वर सोरते, नरेश मोटघरे, एकनाथ मदनकर, विमल पोटभरे, किशोर तांबडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ***उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या!कळमेश्वर : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव आहे. या सुविधांची निर्मिती करून या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. येथे १०० खाटा, ट्रामा केअर सेंटर, सोनोग्राफी, डेंटल केअर सेंटरची मागणीही करण्यात आली. ***