जामनेरातील १२ प्रकल्पांमधून गाळ काढणार २८.५४ लाख खर्च : दोन लाख २० हजार ९२१ घमनीटर गाळ हटणार

By admin | Published: April 28, 2016 12:33 AM2016-04-28T00:33:09+5:302016-04-28T00:33:09+5:30

जळगाव : जामनेर तालुक्यातील १२ लघु पाटबंधारे तलावांच्या बुडीत क्षेत्रातील जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. जलयुक्त शिवार अभियान आणि महात्मा फुले अभियान या योजनेतून संबंधित कामास मंजुरी मिळाली असून, गाळ काढण्यासाठी २८ लाख ५४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

28.54 lakhs spent on 12 projects in Jamnagar: 2 lakh 20 thousand 9 21 Ghumnitter muds will be removed | जामनेरातील १२ प्रकल्पांमधून गाळ काढणार २८.५४ लाख खर्च : दोन लाख २० हजार ९२१ घमनीटर गाळ हटणार

जामनेरातील १२ प्रकल्पांमधून गाळ काढणार २८.५४ लाख खर्च : दोन लाख २० हजार ९२१ घमनीटर गाळ हटणार

Next
गाव : जामनेर तालुक्यातील १२ लघु पाटबंधारे तलावांच्या बुडीत क्षेत्रातील जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. जलयुक्त शिवार अभियान आणि महात्मा फुले अभियान या योजनेतून संबंधित कामास मंजुरी मिळाली असून, गाळ काढण्यासाठी २८ लाख ५४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
भागदरा लघु प्रकल्प, चिलगाव, माळपिंप्री, गोद्री, मोहाडी, बिलवाडी, मोयखेडा, महुखेडा, गोंडखेल, पिंप्री, पिंपळगाव, हिवरखेडा या लघु प्रकल्पांमधील गाळ उपसला जाणार आहे.
गाळ काढण्यासाठी आवश्यक इंधनावर शासन खर्च करणार आहे. त्यासाठी यंत्रणा उपलब्ध करण्याची मागणी यांत्रिकी विभागाकडे करण्यात आली आहे.

दोन लाख २० हजार ९२१ घनमीटर गाळ या लघु प्रकल्पांमधून काढला जाणार असून, त्यामुळे ७.७७ दलघफू पाणीसाठा वाढणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

५ हजार घनमीटर गाळ काढला
यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, वाकोद व मोयखेडादिगर या लघु प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रातून पाच हजार घनमीटर गाळ काढला आहे. तर पाचोरा तालुक्यातील लोहारा लघु पाटबंधारे तलावाच्या बुडीत क्षेत्रामधून १४ हजार ३०४ घनमीटर गाळ काढून त्याची वाहतूक झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या साठवण क्षमतेत १४.३० सहस्त्र घनमीटर इतकी वाढ झाली आहे. तर पिंपळगाव- वाकोद येथील तलावाच्या बुडीत क्षेत्रातून पाच हजार ५०२ घनमीटर एवढ्या गाळाची वाहतूक झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या साठवण क्षमतेत ५.५० सहस्त्र घनमीटर इतकी वाढ झाली आहे.

Web Title: 28.54 lakhs spent on 12 projects in Jamnagar: 2 lakh 20 thousand 9 21 Ghumnitter muds will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.