केरळमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे 29 जणांचा मृत्यू तर 54,000 लोक बेघर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 08:53 AM2018-08-11T08:53:37+5:302018-08-11T10:44:42+5:30

केरळमध्ये बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत 29 जणांचा बळी घेतला आहे.

29 killed, over 54,000 homeless as heavy rains continue across Kerala | केरळमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे 29 जणांचा मृत्यू तर 54,000 लोक बेघर

केरळमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे 29 जणांचा मृत्यू तर 54,000 लोक बेघर

Next

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत 29 जणांचा बळी घेतला आहे. आशियातील सर्वांत मोठे वक्राकार धरण म्हणून नावाजलेले केरळमधील इडुक्की धरण पावसामुळे भरुन वाहू लागल्याने धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तब्बल 40 वर्षांत पहिल्यांदाच केरळमध्ये अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असून 54,000 लोक बेघर झाले आहेत. 



मुसळधार पावसाचा राज्यातील सहा जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला असून, मदतकार्यासाठी तीनही सेनादलांना पाचारण करण्यात आले आहे. केरळमधील सहा जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये बंद आहेत तसेच अत्यावश्यक काम नसेल तर प्रवास टाळावा, अशी सूचना राज्यातल्या डोंगराळ भागातील रहिवाशांना देण्यात आली आहे. आतापर्यंत 55 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. प्रचंड पावसामुळे वयानड जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून त्याचा इतर भागांशी संपर्क तुटलेला आहे. तेथील तब्बल 10,400 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 



 

Web Title: 29 killed, over 54,000 homeless as heavy rains continue across Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.