भारीच! दिवसभर बँकेत काम, संध्याकाळी चहाचं दुकान; 'स्टूडेंट चायवाला स्टॉल' झाला फेमस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 04:31 PM2023-08-16T16:31:41+5:302023-08-16T16:32:26+5:30
गंगाधर हा दिवसा बँकेत काम करतो. बँकेचं काम संपल्यानंतर, तो संध्याकाळी त्याच्या दुकानात येतो, जिथे तो लोकांना वेगवेगळ्या चवीचा चहा देतो.
तुम्ही चहा पीत असाल आणि जास्तीत जास्त व्हरायटीच्या चहाचा आस्वाद घेत असाल, तर तुम्हाला चार-पाच प्रकारच्या चहा माहीत असतील. तुम्हाला जर कोणी 20 ते 25 प्रकारच्या चवीचा चहा मिळत असल्याचं सांगितलं तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हे खरं आहे. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात, एक तरुण स्थानिक बाजारात चहा विकतो. हा तरुण या परिसरात 'स्टूडेंट चायवाला' या नावाने प्रसिद्ध आहे.
दुकानाचा मालक 29 वर्षीय गंगाधर असून तो लोकांना त्याच्या दुकानात त्यांच्या आवडीच्या विविध प्रकारचा चहा देतो. ओडिशाच्या बेरहामपूर येथे त्याचे दुकान आहे. रोज संध्याकाळी त्यांच्या दुकानावर विद्यार्थ्यांची आणि इतर तरुणांची मोठी गर्दी जमते, ते इथे त्यांच्या आवडीचा चहा प्यायला येतात.
स्टूडेंट चायवाला स्टॉल पाहून तरुण खूप प्रभावित झाले आहेत. या स्टॉलवर त्यांना रोज टी, केशर चहा, चॉकलेट चहा या चवीचा चहा प्यायला मिळतो आणि चहा पिऊन सर्वांना आनंद मिळतो. पूर्वी बेरहामपूरमध्ये चहाचं दुकान नव्हतं पण आता खल्लिकोट कॉलेजजवळ हे चहाचं दुकान सुरू झालं आहे.
विशेष म्हणजे गंगाधर हा दिवसा बँकेत काम करतो. बँकेचं काम संपल्यानंतर, तो संध्याकाळी त्याच्या दुकानात येतो, जिथे तो लोकांना वेगवेगळ्या चवीचा चहा देतो. स्टुडंट चायवालाची कीर्ती गंजम जिल्हा आणि बेरहामपूरच्या सीमा ओलांडून संपूर्ण ओडिशामध्ये पसरली आहे. गंगाधर ज्या पद्धतीने चहा बनवतो, त्याच्या चहाच्या चवीने लोकांना वेड लावलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.