मोठी बातमी! कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर DRDO चं औषध प्रभावी, संशोधनातून दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 07:54 PM2021-06-16T19:54:54+5:302021-06-16T19:55:19+5:30
कोरोनावर उपचारांसाठी विकसीत करण्यात आलेलं 2-DG औषध कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे.
कोरोनावर उपचारांसाठी विकसीत करण्यात आलेलं 2-DG औषध कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. 2-DG औषध कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटच्या संक्रमणाला रोखू शकतं असा दावा करण्यात आला असून या औषधामुळे विषाणूचं मल्टीप्लिकेशन देखील कमी होतं, असंही नमूद करण्यात आलं आहे.
देशात सध्या कोरोना उपचारांसाठी 2-DG औषधाला मान्यता देण्यात आलेली आहे. 2-DG हे औषध सुरुवातीला कोरोनाच्या दोन व्हेअरिंटवर म्हणजेच B.6 आणि B.1.1.7 वर वापर करुन पाहण्यात आलं. पण यात अँटी-व्हायरल गुण असल्यानं हे औषध कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारं 2-DG औषध संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) विकसीत केलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. 2-DG हे औषध रुग्णांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी आणि ऑक्सिजन सिलिंडरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत करतं. डॉ. रेड्डीज लॅबरॉटरीनं हे औषध पाऊच्या रुपात लाँच केलं आहे. जे पाण्यात मिसळून घेता येतं.