२जीची अंतिम सुनावणी

By Admin | Published: September 11, 2014 01:42 AM2014-09-11T01:42:20+5:302014-09-11T01:42:20+5:30

दिल्लीतील एक न्यायालय १० नोव्हेंबरपासून टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणात अंतिम सुनावणीला सुरुवात करणार आहे.

2G Final Hearing | २जीची अंतिम सुनावणी

२जीची अंतिम सुनावणी

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्लीतील एक न्यायालय १० नोव्हेंबरपासून टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणात अंतिम सुनावणीला सुरुवात करणार आहे. माजी दूरसंचार मंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोई आणि तीन फर्म यांच्यासह १५ जणांविरुद्ध गेल्या तीन वर्षांपासून सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने आज याप्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
या प्रकरणाची अंतिम सुनावणी १० नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे. कारण याआधी सीबीआयविरुद्ध रविकांत रुईया व इतर तसेच पीएमएलए प्रकरणात बचाव पक्षाची साक्ष आणि आरोपींची उलटतपासणी करण्यात येणार आहे.
दुसरीकडे न्यायालय अंमलबजावणी संचालनालयाचे उपसंचालक राजेश्वरसिंग
यांच्यासह इतरांना सरकारी
साक्षीदार म्हणून बोलविण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी करणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 2G Final Hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.