केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ टक्के वाढीव डीए; कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांची दिवाळी गोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 07:06 AM2021-10-22T07:06:59+5:302021-10-22T07:46:45+5:30

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या सरकारने  दिवाळीपूर्वी गाेड बातमी

3 per cent increase in DA for central employees | केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ टक्के वाढीव डीए; कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांची दिवाळी गोड

केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ टक्के वाढीव डीए; कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांची दिवाळी गोड

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या सरकारने  दिवाळीपूर्वी गाेड बातमी दिली आहे.  सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

या निर्णयाचा देशभरातील सुमारे ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख निवृत्तिवेतनधारकांना लाभ हाेणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे ९ हजार ४८८ काेटी रुपयांचा बाेजा सरकारवर पडणार आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता आता ३१ टक्के हाेणार आहे. केंद्राने काेरेाना महामारीमुळे महागाई भत्ता राेखला हाेता. त्यानंतर यावर्षी जुलैमध्ये सरकारने महागाई भत्ता आणि ‘डीआर’ पूर्ववत केला हाेता. त्यावेळी महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के झाला हाेता. केंद्रापाठोपाठ महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांबाबतही असाच निर्णय होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: 3 per cent increase in DA for central employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.