धाडसी निर्णयांमागे १३० कोटी जनतेची प्रेरणा; चीनपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक भारतात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 03:01 AM2019-09-09T03:01:01+5:302019-09-09T06:16:36+5:30

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे १00 दिवस : आव्हानांना कसे सामोरे जायचे हे सरकारला ठाऊक आहे

3 crore people's motivation for making bold decisions; | धाडसी निर्णयांमागे १३० कोटी जनतेची प्रेरणा; चीनपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक भारतात

धाडसी निर्णयांमागे १३० कोटी जनतेची प्रेरणा; चीनपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक भारतात

googlenewsNext

टेकचंद सोनवणे 

रोहतक : आमच्या सरकारने पहिल्या शंभर दिवसांत जे धाडसी निर्णय घेतले त्यामागे देशातील १३० कोटी जनतेची प्रेरणा होती असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले.

हरयाणामधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जाहीर सभा आयोजिण्यात आली होती. ते म्हणाले की, सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांत जे मोठे निर्णय घेतले त्याचा देशाला भविष्यात फायदा होईल. हे शंभर दिवस म्हणजे विकास, विश्वास व मोठ्या बदलांचे प्रतीक आहे. या कालावधीत राष्ट्रीय सुरक्षा, शेती या क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडविणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. आव्हानांना कसे भिडायचे ते आमच्या सरकारला चांगलेच माहित आहे. संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात महत्त्वाची अनेक विधेयके संमत झाली.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत कामकाजही व्यवस्थित पार पडले. अशी घटना देशाच्या संसदीय इतिहासात गेल्या ६० वर्षांत घडली नव्हती. याचे श्रेय सर्व पक्षांना दिले पाहिजे. मोदी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर, लडाख किंवा पाण्याची उग्र बनलेली समस्या यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांमागे देशातील जनतेची प्रेरणा होती. शेतकऱ्यांना पेन्शन ही महत्त्वाची योजना आहे. तशाच प्रकारचा लाभ लघु, मध्यम व्यावसायिकांनाही मिळणार आहे. चांद्रयान मोहिम-२मुळे संपूर्ण देशात इस्रोविषयी अभिमान उचंबळून आला व त्या भावनेने देश एकवटला गेला. या मोहिमेकडे सारा देश यशापयशाचा विचार न करता पाहात आहे. 

जागतिक बदलांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही
नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेत मोठ्या घडामोडी सुरू असल्या तरी भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असल्याची ग्वाही केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मोदी सरकारच्या काळात गतवर्षी चीनपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक भारतात आली. त्यामुळे लवकरच आपण ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोदी सरकारच्या दुसºया कार्यकाळातील १०० दिवसांमधील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. ‘जन कनेक्ट’ या पुस्तकाचेही प्रकाशन त्यांनी केले.

१०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांची योजना मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना देईल, असे नमूद करून जावडेकर म्हणाले, उद्योजकांना केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले आहे. केवळ एका दिवसात स्वत:ची कंपनी सुरू करता येते. जीएसटीमध्ये लोकहितासाठी महत्त्वाचे बदल आम्ही केले. ग्रामीण भागासाठी घरांची योजना आणली. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात मदत मिळते. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. ७ कोटी ३७ लाख शेतकºयांना त्या योजनेचा लाभ झाला, असेही जावडेकर म्हणाले. बँकांच्या विलीनीकरणावर जावडेकर म्हणाले, योग्य पद्धतीने विलीनीकरण झाले आहे. बँकिंग व्यवस्था भक्कम झाली. अर्थव्यवस्थेला गती मिळाली. जीडीपीच्या आकड्यांवर ‘ग्लोबल इकॉनॉमी इम्पॅक्ट्स सेंटिमेंट्स’ असे उत्तर जावडेकरांनी दिले.
 

Web Title: 3 crore people's motivation for making bold decisions;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.