केनियातील 3 भारतीय आणि 7 नेपाळी तरूणींची सुटका, सुषमा स्वराज यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 07:17 PM2018-01-04T19:17:16+5:302018-01-04T19:31:00+5:30
केंद्र सरकारने केनियातील दहा तरुणींची सुटका केली आहे. यामध्ये 3 भारतीय आणि 7 नेपाळच्या तरुणींचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून दिली.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने केनियातील दहा तरुणींची सुटका केली आहे. यामध्ये 3 भारतीय आणि 7 नेपाळच्या तरुणींचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून दिली.
सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, केनियामध्ये अडकलेल्या 3 भारतीय तरूणींची सुटका केली आहे. 3 भारतीय तरूणींसह 7 नेपाळी तरुणींची देखील सुटका करण्यात आली आहे. मानवी तस्करीत अडकलेल्या या तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यांना केनियाहून परत आणण्यात आले आहे. केनियातील मोम्बासा येथे कैद असलेल्या या तरुणींचे पासपोर्ट आणि मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत.
We have rescued three Indian girls from Kenya. The girls were victims of an organised crime syndicate that indulged in trafficking of girls. Seven Nepalese girls were also rescued. Their Passports and phones were taken and they were held captive in Mombasa. /1
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) January 4, 2018
याचबरोबर, मंत्रालयाने याबाबतची माहिती पंजाब सरकारला दिली आहे. त्यानुसार, याप्रकरणात सामील असलेल्या दलाल आणि संबंधित व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या तरूणींची सुटकेसाठी प्रयत्न केल्याबद्दल स्वराज यांनी केनियामधील भारतीय उच्चायुक्त सुचित्रा दुराई आणि सचिव करण यादव यांचे आभार मानले. तसेच, या तुरुणींची सुटका करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी केनियातील पोलिसांचे विशेष आभार सुषमा स्वराज यांनी मानले आहेत.
We have flown our girls back to India. We are sharing details with Government of Punjab so that a case is registered against the agents and people involved. /2
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) January 4, 2018
I appreciate the efforts of Ms.Suchitra Durai, Indian High Commissioner in Kenya. Our First Secretary Karan Yadav deserves a special mention. We thank the Kenyan Police for their help./3 @IndiainKenya@capt_amarinder
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) January 4, 2018