VIDEO : 'आर्मी डे परेड'च्या सरावादरम्यान दोरखंड तुटल्याने अपघात, थोडक्यात बचावले 3 जवान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 09:51 AM2018-01-11T09:51:39+5:302018-01-11T11:32:14+5:30
भारतीय सेना 15 जानेवारीला 'आर्मी डे' साजरा करणार आहे.
नवी दिल्ली - भारतीय सेना 15 जानेवारीला 'आर्मी डे' साजरा करणार आहे. या दिवशी विशेष परेडचं आयोजन करण्यात येतं. दरम्यान, 'आर्मी डे' कार्यक्रमाची तयारी करत असलेल्या जवानांसोबत नवी दिल्ली एक अपघात घडला आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमधून उतरवण्याचा सराव करत असताना 3 जवान अचानक उंचावरुन जमिनीवर पडले. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात जवान जखमी झाले आहेत.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमधून जवान दोरीच्या सहाय्यानं खाली उतरत असताना एक जवान खाली पडत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोर तुटल्यानं ही घटना घडल्याचे दिसत आहे. अद्यापपर्यंत या अपघातामागील अन्य कोणतेही कारण समोर आलेले नाही. मंगळवारी (9 जानेवारी) ही घटना घडली आहे.
3 jawans injured on 9th January 2018 during practice for Army Day. The incident occurred due to helicopter boom malfunction. All the 3 jawans are safe. Investigation is underway: Indian Army
— ANI (@ANI) January 11, 2018
Terrifying accident caught on cam: 3 Indian Army soldiers fall from Dhruv chopper after rapple snaps during slithering ops rehearsal for Army Day parade. Thankfully Army confirms 'no serious injuries to any of the three'. pic.twitter.com/s37aaARYqj
— Mohit Grover (@mohitgroverAT) January 11, 2018