काश्मिरात ३ जवान शहीद
By admin | Published: February 15, 2017 03:12 AM2017-02-15T03:12:17+5:302017-02-15T03:12:17+5:30
काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील चकमकीत मंगळवारी एक दहशतवादी मारला गेला, तर तीन सैनिक शहीद झाले. हाजीन भागातील
श्रीनगर : काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील चकमकीत मंगळवारी एक दहशतवादी मारला गेला, तर तीन सैनिक शहीद झाले. हाजीन भागातील या चकमकीत सहा जवान आणि एक नागरिक असे सात जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दहशतवादी असलेल्या भागाची सुरक्षा दलांनी नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू करताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला, तेव्हा चकमकीला तोंड फुटले.
दहशतवाद्यांनी घरातून केलेल्या गोळीबारात नऊ जवान जखमी झाले. त्यापैकी तिघांचा नंतर मृत्यू झाला. या मोहिमेत एक दहशतवादी मारला गेला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मोहिमेदरम्यान, सीआरपीएफच्या ४५ व्या बटालियनचे कमांडिंग आॅफिसर चेतनकुमार चिता यांना अनेक गोळ्या लागल्या आहेत.
जम्मू : सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एका भुयाराचा छडा लावल्यामुळे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. भुयार प्रतिबंधक मोहिमेदरम्यान बीएसएफने सोमवारी रामगड सेक्टरमध्ये भारतीय सीमेच्या आत २० मीटर लांबीच्या भुयाराचा छडा लावला. त्यामुळे पाकचे मनसुबे उधळले गेले आहेत. या भुयाराची रुंदी अडीच फूट आहे. या भुयाराचे दुसरे टोक पाकिस्तानात आहे. भुयार पूर्णपणे तयार झाले नव्हते. तत्पूर्वीच त्याचा छडा लावण्यात आल्यामुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत. (वृत्तसंस्था)