लष्करे तय्यबाच्या ८ दहशतवाद्यांना अटक; सोपोरमध्ये धमकीची भित्तीपत्रके लावली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:55 AM2019-09-11T03:55:50+5:302019-09-11T06:33:12+5:30

काश्मीरमधील काही भागांत पुन्हा निर्बंध लागू

3 militants detained by Army Corps; Threat murals were installed in Sopore | लष्करे तय्यबाच्या ८ दहशतवाद्यांना अटक; सोपोरमध्ये धमकीची भित्तीपत्रके लावली

लष्करे तय्यबाच्या ८ दहशतवाद्यांना अटक; सोपोरमध्ये धमकीची भित्तीपत्रके लावली

Next

श्रीनगर : काश्मीरमधील नागरिकांना धमकाविणारी भित्तीपत्रके लावल्याप्रकरणी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातून लष्कर-ए-तय्यबाच्या (एलईटी) आठ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी अटक केली आहे. मोहरमनिमित्त नागरिकांनी मिरवणुका काढून त्यातून अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी मंगळवारी श्रीनगर व काश्मीरच्या काही भागांत निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले होते.

यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, काश्मिरी नागरिकांनी हरताळ पाळण्याचे आवाहन सोपोर व परिसरात लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकांमध्ये करण्यात आले होते, तसे न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागण्याचा इशाराही दहशतवाद्यांनी दिला होता. सोपोरमध्ये गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अडीच वर्षे वयाच्या बालिकेसह एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसरात अधिक कडक बंदोबस्त ठेवला आहे.

बाजारपेठा बंदच
३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध त्या-त्या परिसरातील स्थितीनुसार शिथिल करण्यात किंवा पुन्हा लागू करण्यात येत आहेत. काश्मीरमध्ये खासगी वाहनांची वाहतूक सुरू झाली असली तरी सार्वजनिक वाहतूक सेवा व बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. अनेक भागांत बंदसदृश वातावरण आहे. सरकारी शाळा, कार्यालये उघडली असली तरी तिथे कमी उपस्थिती असते. खासगी शाळा बंद आहेत. मुलांच्या सुरक्षेच्या काळजीमुळे त्यांना शाळेत पाठविण्यास पालक तयार नाहीत.

भारत-पाक तणाव काहीसा निवळला - ट्रम्प
वॉशिंग्टन : भारत व पाकिस्तानमध्ये दोन आठवड्यांपूर्वी होता तितका तणाव आता राहिलेला नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दक्षिण आशियातील या शेजारी राष्ट्रांमधील तणाव कमी होण्यासाठी अमेरिका सहकार्य करण्यास तयार आहे, असेही त्यांनी पुन्हा म्हटले आहे.

जी-७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट झाली होती. त्यानंतर प्रथमच ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तानमधील मतभेदांबाबत हे वक्तव्य केले आहे. व्हाईट हाऊस येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, काश्मीर प्रश्नावरून भारत व पाक तणाव वाढला होता.

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने रद्द केले. जम्मू-काश्मीर व लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भांडवल करण्याचा केलेला प्रयत्नही फोल ठरला. ३७० कलम रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी भूमिका अनेक देशांनी घेतली.

मध्यस्थी भारताला अमान्य
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत काश्मीरप्रश्नी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी ट्रम्प यांनी दाखविली होती. तसा प्रस्ताव आपण ठेवल्याचे दोन्ही देशांना माहिती आहे, असेही ट्रम्प म्हणाले होते. मात्र, मोदींबरोबर फ्रान्समध्ये झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी आपल्याच भूमिकेपासून घूमजाव केले. काश्मीर प्रश्न भारत व पाकिस्तानने चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, असे त्यांनी म्हटले आहे. काश्मीर प्रश्नी भारताला त्रयस्थ देशाची मध्यस्थी नको आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याबरोबरच्या बैठकीत स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा ट्रम्प चर्चेमध्ये सहकार्याची भाषा करीत आहेत.

काश्मीरस्थित सीआरपीएफच्या हेल्पलाईनवर आपत्तीकाळात आले ३४ हजार फोन कॉल्स
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) श्रीनगरस्थित आपत्तीकाळात मदतनीस (मददगार) दूरध्वनी कक्षात (हेल्पलाईन) ३४ हजारांहून अधिक फोन आले. यापैकी बव्हंशी काश्मीरमध्ये राहणाऱ्या आप्तजनांची ख्यालीखुशालीबाबत विचारणा करणारे होते.

५ ऑगस्टनंतर एकूण ३४ हजार २७४ फोन मदतनीस १४,४११ या दूरध्वनी क्रमांकावर आणि काही अन्य मोबाईल नंबरवर आले. बव्हंशी फोन काश्मीरमध्ये राहणारे नातेवाईक आणि कुटुंबाबाबत कुशल-मंगलबाबत आणि तेथील स्थितीबाबबत विचारणारे होते, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. १,२२७ फोन तातडीच्या निकडीसंदर्भात होते. अशा फोनची दखल घेऊन सीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी लोकांच्या घरी जाऊन फोन करणारी व्यक्ती आणि कुटुंबियांत संपर्क साधून देण्यात आला. दूरध्वनी मदतनीस कक्षातील सीआरपीएफच्या कर्मचाºयांनी स्थानिक लोकांच्याही घरी जाऊन त्यांना विमानाच्या तिकिटांचे वितरण, राज्याबाहेर शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा मुलाखतीच्या तारखांबाबत माहिती देण्यास विविध प्रकारे मदत केली.

Web Title: 3 militants detained by Army Corps; Threat murals were installed in Sopore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.