अत्याचारपीडित महिला कर्मचाऱ्यास ३ महिने पगारी रजा
By admin | Published: August 13, 2015 10:15 PM2015-08-13T22:15:03+5:302015-08-13T22:15:03+5:30
देशभरातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे वृत्त आहे. आता कामकाजाच्या ठिकाणी लैंगिक
Next
नवी दिल्ली : देशभरातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे वृत्त आहे. आता कामकाजाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या कर्मचाऱ्यास तीन महिन्यांची पगारी रजा मिळेल. तक्रार समितीने शिफारस केल्यास पीडित महिला अथवा आरोपी अधिकाऱ्याची बदलीसुद्धा होऊ शकेल. कार्मिक व प्रशिक्षण राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार कार्यस्थळी महिला कर्मचाऱ्यांवरील लैंगिक शोषणाच्या तक्रारीसंबंधी दिशानिर्देश बजाविण्यात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)