3 जवानच नाही, तीन कुटुंबांची स्वप्न उद्ध्वस्त झाली - वीरेंद्र सेहवाग
By admin | Published: April 27, 2017 11:37 AM2017-04-27T11:37:15+5:302017-04-27T11:37:15+5:30
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पुन्हा एकदा उरी हल्ल्याची पुनरावृत्ती झाली आहे. या हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पुन्हा एकदा उरी हल्ल्याची पुनरावृत्ती झाली आहे. या हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. महत्वाच्या घडामोडींवर भाष्य करणा-या सोशल मीडियावर लगेचच या घटनेचे पडसाद उमटले असून, आपण प्रत्युत्तर कधी देणार ? असा सवाल विचारला जात आहे.
टि्वटरवर नेहमीच सक्रीय असणा-या वीरेंद्र सेहवागने फक्त तीन जवान शहीद झाले नाहीत तर, तीन कुटुंबांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली. जो काही उपाय असेल तो केला पाहिजे, हे सर्व कुठेतरी थांबायला हवे असे टि्वट सेहवागने केले आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू गीत फोगटनेही कुपवाडा तळावरील भारतीय जवानांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे.
गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांनी कुपवाडा येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात कॅप्टनसह दोन जवान शहीद झाले. लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. कॅप्टन आयुष असं शहीद झालेल्या अधिका-याचं नाव आहे. पाच जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी श्रीनगरमधील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या हल्ल्यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
3 soldiers martyred, dreams of 3 families shattered, as we were sleeping . Whatever be the solution,this now has to end somewhere.#Kupwara
— Virender Sehwag (@virendersehwag) April 27, 2017