सर्व नोक-यांमध्ये ३% जागा अपंगांना
By admin | Published: September 13, 2014 02:06 AM2014-09-13T02:06:13+5:302014-09-13T02:06:13+5:30
आयएएसमधील नियुक्त्या आणि बढत्यांसह सर्व श्रेणीच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये अपंगांना तीन टक्के आरक्षण द्यायलाच हवे
वर्धा : जिल्ह्यातील आठही पंचायत समितीची निवडणूक येत्या १४ सप्टेंबर रविवारी होत आहे. यात पंचायत समिती आपल्या ताब्यात रहावी याकरिता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार आपल्याकडे उमेदवार आहे काय याची चाचपणी पहिलेच झाली. यात उमेदवारही ठरला आहे. काही ठिकाणी ही निवडणूक अविरोध होणार असल्याचे संकेत मिळत आहे. असे असले तरी ही निवडणूक विधासनभेच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने साऱ्याच राजकीय पक्षांनी त्यांची जुळवाजुळव करून आपली सत्ता कशी येईल याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. यात कुठे अभद्र युतीकरून तर कुठे ईश्वर चिठ्ठीतून सभापती पद मिळण्याचे संकेत मिळत आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)
वर्धा पंचायत समिती काँग्रेस-राकॉ राखणार ?
२२ सदस्य असलेली वर्धा पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात होती. या समितीचे सभापतिपद यंदा सर्वसाधारण महिलेकरिता राखीव आहे. असे असले तरी ही पंचायत समिती काँग्रेसच्या वाट्यालाच राहिल असे चित्र आहे. येथे काँग्रेसचे आठ तर राष्ट्रवादीचे दोन व अपक्ष दोन या युतीने सत्ता स्थापित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या सोबत सेना होती तर बसपा तटस्थ राहीली होती. यंदाही तसेच चित्र असल्याचे संकेत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची युती असून त्यांच्या सोबत दोन अपक्ष आहेत. यामुळे त्यांचे संख्याबळ १२ होत आहे. यात काँग्रेसचे आठ, राकॉचे दोन व अपक्ष दोन अशी संख्या आहे. गत वर्षी त्यांच्या सोबत असलेला सेनेचा उमेदवार यंदा सोबत राहणार नसल्याचे चित्र आहे. तर पंचायत समितीत भाजपचे आठ सदस्य आहे. यामुळे पंचायत समिती आपल्या ताब्यात राहावी, याकरिता भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. जोडतोडीचे राजकारण झाल्यास वर्धा पंचायत समितीत संत्तातर झाल्यास वावगे नाही; मात्र सत्ता काबीज करण्याकरिता सत्ताधाऱ्यांनी पहिलेच सर्व जोड करून ठेवल्याचे बोलले जात आहे.
उमेदवार अद्याप ठरला नाही
गत अडीच वर्षांत पंचायत समितीचे सभापतिपद काँगे्रसच्या वाट्याला तर उपसभापतिपद राकॉच्या वाट्याला आले आहे. यंदाही तेच समिकरण राहण्याचे संकेत आहेत. मात्र सभापती कोण राहील याची निवड होणे बाकी आहे. ही निवड पक्षाचे जिल्ह्याचे नेते वर्धेत आल्यानंतर होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे सभापतीपदी कोणची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
हिंगणघाट पं.स. आपसी समझोत्याने ठरविणार सभापती
हिंगणघाट पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाची निवडणूक अविरोध होण्याची शक्यता आहे. या संदर्भात राकॉ, काँगे्रस व स्वभाप सदस्यांची बैठक होवून आपसी समझोत्याने उमेदवार ठरविण्याचे मान्य करण्यात आले आहे. काँग्रेसचा गट नामदारांशी बोलणी करून आपल्या पक्षाचा उमेदवार ठरविणार असल्याचे वृत्त आहे. येथील पंचायत समिती १४ सदस्यांची असून यात राकाँचे सहा, काँगे्रस चार, स्वभाप एक, तर भाजपा दोन व शिवसेनेचा एक सदस्य आहे. गत निवडणुकीत राकाँ-काँग्रेस, स्वभापच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सभापती तर काँगे्रसला उपसभापती पद मिळाले होते. आताही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
समुद्रपूर येथे अभद्र युती कायम राहण्याचे संकेत
नेहमीच अभद्र युती करून सत्ता काबीज केल्याचा समुद्रपूर पंचायत समितीचा इतिहास आहे. येथील सभापती ओबीसी महिलेकरिरता राखीव असल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पंचायत समितीत २००७ मध्ये काँग्रेस व शिवसेना युती करून काँग्रेसचे डॉ़ खुजे सभापती तर शिवसेनेचे पांडुरंग पिचरकाटे उपसभापती झाले होते. २००९ मध्ये काँग्रेस-सेना युती कायम राहिली़ यावेळी शिवसेनेचे मोहन थुटे सभापती झाले होते. २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नंदा साबळे राष्ट्रवादीला समर्थन देवून सभापती झाल्या. भाजपाच्या संध्या डांगरी उपसभापती झाल्या़ यामुळे येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपची युती होत सभापतिपद भाजपाच्या संध्या डांगरी तर राष्ट्रवादीचे अशोक वांदीले हे उपसभापती होण्याची चिन्ह दिसत आहे़
या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे तीन, भाजपाचे तीन, काँगे्रस दोन, शिवसेना एक, अपक्ष दोन, शेतकरी संघटना एक असे पक्षीय बलाबल आहे़ सभापती पदाकरिता ओबीसी महिला राखीव असून त्यामध्ये नंदा साबळे, संध्या डांगरी, डॉ़ चेतन खुजे, छाया निमजे रांगेत आहेत. येत्या विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून युती तुटण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे या चार उमेदवारांपैकी कोणीही सभापती पदी विराजमान होऊ शकते़