भारतीय लष्कराच्या जाळ्यात ३ दहशतवादी अडकले; चारही बाजूंनी रस्ते घेरले, ड्रोनद्वारे हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 02:06 PM2023-09-15T14:06:16+5:302023-09-15T14:10:02+5:30

कोणतीही हानी होऊ नये म्हणून सुरक्षा दल अत्यंत सावधगिरीने संथ गतीने पुढे जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

3 terrorists caught in Indian Army's net; Roads surrounded on all sides, attacked by drones | भारतीय लष्कराच्या जाळ्यात ३ दहशतवादी अडकले; चारही बाजूंनी रस्ते घेरले, ड्रोनद्वारे हल्ला

भारतीय लष्कराच्या जाळ्यात ३ दहशतवादी अडकले; चारही बाजूंनी रस्ते घेरले, ड्रोनद्वारे हल्ला

googlenewsNext

दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये अजूनही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी दोन ते तीन टीआरएफ दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले असल्याची माहिती मिळाली आहे. टेकडीवर लपलेल्या दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांनी अंतिम कारवाई सुरू केली आहे. ड्रोनमधून त्यांच्या लपून बसलेल्या ठिकाणावर स्फोटके टाकण्यात आली, त्यामुळे मोठा स्फोट झाला आणि काही आगीसह धूरही निघाला. यावेळीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घेरावात तीन दहशतवादी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. पॅरा कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. 

कोणतीही हानी होऊ नये म्हणून सुरक्षा दल अत्यंत सावधगिरीने संथ गतीने पुढे जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचीही मदत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले असून त्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. एप्रिलमध्ये पुंछमध्ये लष्कराच्या ५ जवानांवर ज्या दहशतवादी मॉड्यूलने हल्ला केला होता, त्याच दहशतवादी मॉड्यूलने अनंतनागमध्ये हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांना एकत्र करून तयार केलेले हे नवे दहशतवादी मॉड्यूल ६ महिन्यांपासून खोऱ्यात सक्रिय आहे.

मंगळवारी सुरक्षा दलांना अनंतनागच्या कोकरनागमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. मंगळवारी रात्र असल्याने ती थांबविण्यात आली. बुधवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले होते. सुरक्षा दलाचे अधिकारी दहशतवादी लपलेल्या ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. यादरम्यान लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना गोळ्या लागल्या. जखमी अधिकाऱ्यांना तातडीने हेलिकॉप्टरने विमानाने हलवण्यात आले, मात्र या अधिकाऱ्यांना वाचवता आले नाही. बुधवारी जखमी झालेल्या एका जवानाचाही गुरुवारी मृत्यू झाला. या दहशतवादी घटनेची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची दहशतवादी संघटना असलेल्या टीआरएफने घेतली आहे. या हल्ल्यात १० लाख रुपयांचे इनाम असलेला दहशतवादी उझैरचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

लष्कराने आधुनिक शस्त्रे तैनात केली

कोकरनागच्या जंगलात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांनी तळ ठोकला आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा जंगलात शोधमोहीम सुरू करण्यात आली. गुरुवारी पहाटे चकमक परिसरातून तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, आम्ही दहशतवाद्यांना घेरले आहे. त्यांना सोडले जाणार नाही. ऑपरेशन लवकर संपवण्यासाठी आमचे जवान सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या कारवाईत नवीन पिढीतील सर्व शस्त्रे आणि उपकरणे वापरली जात आहेत. ड्रोनपासून ते हेलिकॉप्टरपर्यंतचा वापर केला जात आहे.

Web Title: 3 terrorists caught in Indian Army's net; Roads surrounded on all sides, attacked by drones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.