लष्कराने कंठस्नान घातलेल्या 'त्या' दहशतवाद्यांची ओळख पटली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 11:12 AM2019-10-23T11:12:36+5:302019-10-23T11:19:08+5:30
हामिद लल्हारी हा अंसर-गजवात-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होत्या.
श्रीनगर : भारतीय लष्कराच्या जवानांनी जम्मू-काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्याचे कंबरडे मोडले आहे. जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा परिसरात काल सायंकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
मंगळवारी अवंतीपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळालीच होती. त्यानुसार शोध मोहिम राबवण्यात आली. यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेली शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. मात्र, त्यावेळी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली नव्हती. याबाबत तपास केला असता या दहशतवाद्यांनी ओळख पटल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
Kashmir Zone Police: 3 terrorists killed in #Awantipora encounter yesterday have been identified as Naveed Tak, Hamid Lone aka Hamid Lelhari and Junaid Bhat. Arms & ammunition recovered; Case registered.
— ANI (@ANI) October 23, 2019
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खात्मा करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांची नावे नवीद ताक, हमीद लोन ऊर्फ हामिद लल्हारी आणि जुनैद भट अशी आहेत. हामिद लल्हारी हा अंसर-गजवात-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होत्या.
#WATCH J&K DGP Dilbag Singh briefs the media in Srinagar https://t.co/bvNRmAVzvs
— ANI (@ANI) October 23, 2019
दरम्यान, गेल्या रविवारी दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार करण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या या नापाक कारवायांविरोधात भारतीय लष्कराने धडक मोहीम हाती घेत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला होता. गेल्या रविवारी भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत पाकिस्तानचे सैनिक आणि अनेक दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येते.
J&K DGP Dilbag Singh in Srinagar: We will be successful in our efforts to curb terrorism only when the local youth of Kashmir do not take the path of militancy and choose the path of peace. https://t.co/lWvhkLweiz
— ANI (@ANI) October 23, 2019