दहशतवादी हल्ल्यात ३ मजूर ठार
By admin | Published: January 10, 2017 01:26 AM2017-01-10T01:26:40+5:302017-01-10T01:26:40+5:30
दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सीमा रस्तेबांधणी संस्थेच्या सामान्य अभियांत्रिकी राखीव दलाच्या छावणीवर (जीआरईएफ) सोमवारी
जम्मू : दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सीमा रस्तेबांधणी संस्थेच्या सामान्य अभियांत्रिकी राखीव दलाच्या छावणीवर (जीआरईएफ) सोमवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या हल्ल्यात तीन मजूर ठार झाले. हे मजूर रस्तेबांधणी करणारे होते.
दहशतवाद्यांनी जम्मूच्या अखनूर भागातील बट्टाल गावाजवळील छावणीवर हल्ला केला. यात तीन नागरिक ठार झाले, ते जीआरईएफसाठी मजूर होते. दहशतवादी सीमेपलीकडून आले असण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
काश्मीर असंतोषातील बळींना ५ लाख मदत
दहशतवाद्यांचा म्होरक्या बुऱ्हान वणी सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाल्यानंतर, गेल्या वर्षी काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या असंतोषात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना, प्रत्येकी पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी राज्य विधानसभेत केली.
सुरक्षा दलांनी पोलिसांसमवेत परिसराला वेढा दिला असून, दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. घटनास्थळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. शोध मोहीम वेगात सुरू आहे. या छावणीवर दोन किंवा त्याहून अधिक दहशतवाद्यांनी हल्ला केला असावा, असा अंदाज आहे.
शांतता प्रक्रियेत फुटीरवाद्यांचा खोडा
जम्मू आणि काश्मिरातील शांतता प्रक्रियेत पाकिस्तान आणि फुटीरवाद्यांनी खोडा घातल्याचा घणाघात मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी केला. खोऱ्यात अशांतता निर्माण करण्याची आधीच ‘तयारी’ करण्यात आली होती, असा आरोपही त्यांनी केला.सर्वपक्षीय शिष्टमंडळाला नकार दिल्यामुळे काश्मिरातील शांतता प्रक्रियेला खीळ बसली. खोऱ्यात पाच महिन्यांपासून अशांतता आहे.