अरे देवा! 3 वर्षीय चिमुकल्याने गिळली गणपतीची मूर्ती, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 03:36 PM2021-07-25T15:36:37+5:302021-07-25T15:39:19+5:30
3 year old boy swallows ganesha idol : एका चिमुकल्याने गणपती बाप्पाची मूर्ती गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूर्ती गिळल्यानंतर मुलाची प्रकृती गंभीर झाली.
नवी दिल्ली - मुलांची योग्य काळजी न घेणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे अनेकदा घातक ठरत आहे. अशीच एक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. एका चिमुकल्याने गणपती बाप्पाची मूर्ती गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूर्ती गिळल्यानंतर मुलाची प्रकृती गंभीर झाली. एक्स-रे रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. डॉक्टरांनी अजिबात वेळ वाया न घालवता एक्स-रेच्या माध्यमातून मूर्ती कुठे आहे याचा शोध घेतला आणि ती लवकरात लवकर बाहेर काढून मुलाची जीव वाचवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या बंगळुरूमधील तीन वर्षीय चिमुकल्याने सुमारे 5 सेंटीमीटर लांबीची गणेश मूर्ती गिळली होती. प्रकृती बिघडल्याने या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे उपचारानंतर मुलाला वाचवण्यात यश आलं. मुलावर बंगळुरूच्या मणिपाल रुग्णालयात उपचार केले गेले. या मुलाने खेळताना गणपती बाप्पाची छोटी मूर्ती गिळली. नंतर मुलाच्या छातीमध्ये दुखू लागलं तसेच त्याला लाळ गिळतानाही त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी छाती आणि गळ्याचा एक्स रे काढला असता मुलाच्या शरीरात गणपतीची मूर्ती असल्याचं दिसून आलं.
AIIMS च्या डॉक्टरांची कमाल; रुग्णाला बेशुद्ध न करताच केली सर्जरी #AIIMS#Hospital#Doctor#Indiahttps://t.co/b7xNpaESe2
— Lokmat (@MiLOKMAT) July 24, 2021
डॉक्टरांनी एंडोस्कोपीचा वापर करत ऑपरेशन करून त्याच्या शरीरातून ही मूर्ती बाहेर काढली. ऑपरेशननंतर काही तासातच त्याला डिस्चार्जही देण्यात आला. मूर्तीमुळे मुलाच्या अन्ननलिकेला इजा झाली होती. तसेच त्याच्या छातीमध्येही दुखत होतं त्यामुळे त्याला गिळताना त्रास होत होता. डॉ. मनीष राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलाला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मात्र, तात्काळ उपचार मिळाल्यामुळे त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली आणि त्याला वाचवणं शक्य झालं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : लहान मुलांना कोरोनाची लागण, पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रिसर्चमधून दावा#coronavirus#CoronavirusPandemic#CoronavirusUpdates#Coronahttps://t.co/pl5NZliM4F
— Lokmat (@MiLOKMAT) July 23, 2021
भारीच! 'ती' हनुमान चालिसा म्हणत होती अन् डॉक्टरांनी केलं 'मेंदूचं ऑपरेशन'; Video व्हायरल
दिल्लीतील एम्सच्या न्यूरो एनेस्थेटिक टीमला (Neuro Anaesthetic) एक मोठं यश मिळालं आहे. डॉक्टरांच्या टीमने एका 24 वर्षीय तरुणीला पूर्ण बेशुद्ध न करताच तिच्या मेंदूचं ऑपरेशन केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही सर्जरी यशस्वी झाली आहे. ऑपरेशनचा एक व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. एम्स रुग्णालयातीलडॉक्टर ऑपरेशन करत होते आणि तरुणी स्वतःवर ऑपरेशन होत असताना हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणत होती. सर्वत्र डॉक्टरांच्या टीमचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! कोरोनावर मात केली पण आरोग्यविषयक समस्यांनी चिंता वाढवली#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/mHy87GLzNV
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2021