टॉरेंट वेबसाईटवर गेल्यास होणार 3 वर्षांची शिक्षा

By admin | Published: August 22, 2016 02:36 PM2016-08-22T14:36:02+5:302016-08-22T18:44:11+5:30

अनेक पॉर्न वेबसाईट्सवर बंदी आणल्यानंतर भारत सरकारने सायबर क्राईमचे कायदे अधिक कडक केले आहेत. आता टॉरेंट साईटवर गेल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच तीन वर्षांचा कारावास आणि तीन लाखांचा दंडही होऊ होईल.

3 years of education for going to Torrent website | टॉरेंट वेबसाईटवर गेल्यास होणार 3 वर्षांची शिक्षा

टॉरेंट वेबसाईटवर गेल्यास होणार 3 वर्षांची शिक्षा

Next
अनिल भापकर / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 : अनेक पॉर्न वेबसाईट्सवर बंदी आणल्यानंतर भारत सरकारने सायबर क्राईम चे कायदे अधिक कडक केले आहेत. आता टॉरेंट साईटवर गेल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच तीन वर्षांचा कारावास आणि तीन लाखांचा दंडही होऊ होईल. अशा आशयाचे मेसेज या टॉरंट वेबसाईटवर दाखविले जात आहेत. बंदी घालण्यात आलेल्या वेबसाईट पाहणे किंवा डाऊनलोड केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. तसंच  Imagebam वर एखादा फोटो पाहिणंही अडचणीचं होईल. ज्या वेबसाईट्सवर बंदी घालण्यात आली आहे, तिथे गेल्यास आपल्याला सूचना मिळते. मात्र यानंतरही त्या साईटमध्ये प्रवेश केला तर ३ वर्षाची शिक्षा आणि ३ लाख रुपये दंड भरावा लागू शकतो.

टॉरंट म्हणजे काय ?
टॉरंट हे बिटटॉरंट तंत्रज्ञानाचा एक भाग आहे. बिटटॉरंट हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर करून मोठ्या फाईल साईज असलेल्या फाइल्स अगदी सहज डाउनलोड करता येतात .समजा तुम्ही एखाद्या टॉरंट वेबसाईट वरून एखादी मोठी फाईल जसे कि चित्रपट किंवा एखादे सॉफ्टवेअर डाउनलोड करत आहात आणि मध्ये तुम्हाला पॉज करावे लागले किंवा पॉज झाले तर या बिटटॉरंट तंत्रज्ञानामुळे तुमची फाईल डाउनलोड ज्या ठिकाणी पॉज झाली तिथून पुढे तुमची फाईल डाउनलोड व्हायला सुरु होते. अर्थात बिटटॉरंट तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट वरून डाउनलोड करणे इतर डाउनलोडच्या मानाने अधिक सोपे झाले त्यामुळे बिटटॉरंट तंत्रज्ञान अल्पावधित नेट प्रेमींमध्ये खूप लोकप्रिय झाले . 

फरक काय ?
बिटटॉरंट तंत्रज्ञान अल्पावधित नेट प्रेमींमध्ये खूप लोकप्रिय होण्याचे मुख्य कारण म्हणजे डाउनलोड स्पीड. जेव्हा आपण इतर वेबसाईट वरून एखादी फाईल डाउनलोड करतो तेव्हा आपण त्या वेबसाईट च्या सर्वर ला डायरेक्ट कनेक्ट होतो. त्यामुळे जर आपल्याप्रमाणे अनेक लोक त्या वेबसाईटला कनेक्ट होऊन फाईल्स डाउनलोड करत असतील तर अर्थातच सर्वर वर लोड येईल आणि डाउनलोड स्लो होईल . मात्र बिटटॉरंट तंत्रज्ञान हे पी टू पी प्रोटोकॉल वर काम करत असल्यामुळे जे लोक टॉरंट साईट वरून सतत फाईल अपलोड आणि डाउनलोड करतात पी टू पी प्रोटोकॉल त्यांचा काम्पुटर आपल्या नेटवर्क मध्ये घेतो व इतरांना फाईल्स डाउनलोड करण्यासाठी त्यांच्या कॉम्पुटरचा ऍड्रेस देतो. म्हणजे तुमचा कॉम्पुटर हा टॉरंट वेबसाईट चा सर्वर म्हणून काम करतो. असे लाखो कॉम्प्युटर्स टॉरंट साईटच्या नेटवर्क मध्ये ऍड झालेले आहेत. त्यामुळे एकच फाईल जरी हजारो लोकांनी एकाच वेळी डाउनलोड केली तरी काही फरक पडत नाही कारण प्रत्येक डाउनलोड साठी वेगवेगळा सर्वर वापरला जातो. 

मग प्रॉब्लेम कुठे आहे ?
टॉरंट वेबसाईट चा वापर प्रॉमुख्याने फाईल शेरिंग साठी केला जातो . मात्र याचा गैरवापर अधिक होऊ लागला जसे कि चित्रपट किंवा सॉफ्टवेअर किंवा टीव्ही वरील कॉपीराईट कंटेन्ट मोठ्या प्रमाणावर शेअर होऊ लागले त्यामुळे या क्षेत्रातील व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होऊ लागला.तसेच टॉरंट वेबसाईटचा वापर करून हॅकर अनेक कॉम्प्युटर्स हॅक करण्याच्या घटना देखील घडू लागल्या त्यामुळे अर्थातच टॉरंट वेबसाईटच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होऊ लागली . त्यामुळे भारतासहित अनेक देशात अनेक टॉरंट वेबसाईटस वर बंदी घातली गेली .

 
मिळणारी सूचना खालीलप्रमाणे असते - 
सरकार किंवा न्यायालयाकडून मिळालेल्या निर्देशानुसार ही वेबसाईट बंद करण्यात आल्याचं या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे. या वेबसाईटवर काहीहा पाहणं, डाऊनलोड करणं, यावरील माहितीची कॉपी तयार करणं कायदेशीर गुन्हा आहे. कॉपीराईट कायद्याअंतर्गत 3 वर्ष कारावास आणि 3 लाखांचा दंड होऊ शकतो अशी माहितीही या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. 
 
तसंच कोणाला ही वेबसाईट बंद करण्यावर आक्षेप असेल तर एका ई-मेल आयडीवर ती व्यक्ती संपर्क करु शकते असंही या मेसेजमध्ये शेवटी सांगण्यात आलं आहे. तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली याची माहिती 48 तासात पुरवली जाईल. त्या माहितीच्या आधारे संबंधित व्यक्ती उच्च न्यायालय किंवा संबंधित विभागाकडे दाद मागत आपली तक्रार ठेवू शकतात.
 
 

Web Title: 3 years of education for going to Torrent website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.