CoronaVirus: पॉझिटिव्ह बातमी! कॅन्सर झालेल्या ३ वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात; रुग्णालयात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 05:09 PM2021-05-14T17:09:56+5:302021-05-14T17:11:04+5:30

CoronaVirus: बिकट परिस्थितीतही एक चांगली, सकारात्मक बातमी समोर आली आहे.

3 years old child from varanasi who suffering cancer beats corona in just 7 days | CoronaVirus: पॉझिटिव्ह बातमी! कॅन्सर झालेल्या ३ वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात; रुग्णालयात जल्लोष

CoronaVirus: पॉझिटिव्ह बातमी! कॅन्सर झालेल्या ३ वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात; रुग्णालयात जल्लोष

Next
ठळक मुद्देकॅन्सर झालेल्या ३ वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मातरुग्णालयात जल्लोषरुग्णालयात सकारात्मक वातावरण

वाराणसी: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली, तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. परंतु, कोरोना मृत्यूचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुडवडा अद्यापही जाणवत आहे. मात्र, बिकट परिस्थितीतही एक चांगली, सकारात्मक बातमी समोर आली आहे. वाराणसीतील एका तीन वर्षाच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्णालयाने काही काळ आनंदाचे वातावरण होते, असे सांगितले जात आहे. (3 years old child from varanasi who suffering cancer beats corona in just 7 days) 

वाराणसीत असलेल्या होमी भाभा कॅन्सर रुग्णालयातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. एक तीन वर्षांच्या लहान मुलाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. सात दिवसांपूर्वी त्याला या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्ताचा कर्करोग असलेल्या या मुलाला दाखल करण्यात आले, तेव्हा परिस्थिती बिकट होती. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांना हे पाहून धक्काच बसला होता. 

 धक्कादायक! उत्तर प्रदेशात ‘आऊट ऑफ डेट’ किटने १० हजार चाचण्या; बहुतांश रिपोर्ट निगेटिव्ह

कॅन्सरग्रस्त चिमुकल्याची कोरोनावर मात

होमी भाभा कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्न केले आणि अवघ्या ७ दिवसांत तीन वर्षाच्या लहान मुलाने कोरोनावर मात केली. या मुलाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना वॉर्डात जल्लोष साजरा केला. पीपीई किट घालून डॉक्टर आणि नर्स यांनी आनंद व्यक्त केला. संपूर्ण वॉर्डातील अन्य रुग्णांनी टाळ्याच्या कडकडाटात मुलाला शुभेच्छा दिल्या. 

“घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...”

रुग्णालयात सकारात्मक वातावरण

डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी एका हिंदी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, होमी भाभा कॅन्सर रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. तेव्हा त्यांची परिस्थिती फारच बिकट असते. रुग्णांमध्ये सकारात्मकता यावी, ती वाढावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. अवघ्या ३ वर्षांच्या कॅन्सरग्रस्त चिमुकल्याने कोरोनावर मात केल्यामुळे अन्य रुग्णांमध्येही सकारात्मकता आली. उत्साह वाढल्याचे पाहायला मिळत आहे, असे ते म्हणाले. या रुग्णालयात २२ दिवसांत ४७२ कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. यातील २०९ रुग्ण कॅन्सरग्रस्त होते. मात्र, या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती मिळाली आहे. 

गाझा सीमेवर इस्रायलने पाठवले सैन्य; आता जमिनीवरून युद्ध होण्याची शक्यता!

दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. तर, ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. सध्या देशात ३७,०४,८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात पॉझिटीव्हीटी रेट १८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १८.७५ लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, आतापर्यंत १७,९२,९८,५८४ नागरीकांना करोना लसीचा डोस देण्यात आल्या आहे.
 

Web Title: 3 years old child from varanasi who suffering cancer beats corona in just 7 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.