सरकारी बँकांची ३०% एटीएम बंद

By Admin | Published: July 31, 2016 05:35 AM2016-07-31T05:35:11+5:302016-07-31T05:35:11+5:30

देशात सरकारी बँकांची ३० टक्के तर खासगी बँकांची १० टक्के एटीएम विविध कारणांनी बंद असतात

30% ATM off of public sector banks | सरकारी बँकांची ३०% एटीएम बंद

सरकारी बँकांची ३०% एटीएम बंद

googlenewsNext


नवी दिल्ली : देशात सरकारी बँकांची ३० टक्के तर खासगी बँकांची १० टक्के एटीएम विविध कारणांनी बंद असतात, असे रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
वित्त राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती देताना सांगितले की, रिझर्व्ह बँकेने मेट्रो शहरे, मोठी शहरे, अर्धनागरी क्षेत्रे आणि ग्रामीण भागांतील बँकांच्या
४ हजार एटीएमचे प्रातिनिधिक सर्वेक्षण केले. त्यातून हा निष्कर्ष निघाला. तांत्रिक बिघाड, नेटवर्क नसणे, वीज नसणे किंवा पैसे नसणे ही एटीएम बंद राहण्याची कारणे होती. मात्र बंद एटीएमची बँकनिहाय आकडेवारी या सर्वेक्षणात नाही.
मे २०१६ अखेरीस देशात बँकांची त्यांच्या शाखांच्या जागी १,०२,७८९ तर इतर ठिकाणी १,११,४९२ एटीएम होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 30% ATM off of public sector banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.