CoronaVirus News: पहिल्या टप्प्यात ३० कोटी लाेकांना लस; प्राधान्य गटांची निश्चिती करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 07:22 AM2020-11-08T07:22:47+5:302020-11-08T07:23:02+5:30
केंद्रानेही लसीकरणासाठी काही प्राधान्य गट निश्चित केले आहेत.
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना ती देण्यात येईल. त्यामध्ये डॉक्टर, एमबीबीएसचे विद्यार्थी यांचाही समावेश असेल.
भारत बायोटेक व आयसीएमआरच्या संयुक्त संशोधनातून विकसित होत असलेली कोव्हॅक्सिन लस येत्या फेब्रुवारीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीचे वितरण तसेच लसीकरणाच्या विविध टप्प्यांत ती कोणत्या गटांतील लोकांना प्राधान्याने द्यावी याबद्दलचे धोरण केंद्र सरकार आखत आहे. असे प्राधान्य गट राज्यांनीही कळवावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले होते.
केंद्रानेही लसीकरणासाठी काही प्राधान्य गट निश्चित केले आहेत. त्यामध्ये आशा कर्मचारी, नर्स, आरोग्यसेवक, महापालिका कर्मचारी, पोलीस, लष्करी जवान, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेले पण ज्यांना एकाहून अधिक व्याधी आहेत अशा विविध लोकांचा समावेश आहे.