३०... खात... निवडणूक

By admin | Published: January 30, 2015 09:11 PM2015-01-30T21:11:50+5:302015-01-30T21:11:50+5:30

(फोटो)

30 ... to eat ... election | ३०... खात... निवडणूक

३०... खात... निवडणूक

Next
(फ
ोटो)
खात पंचायत समिती भाजपकडे
पोटनिवडणूक : शिवसेना दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर
मौदा/कोदामेंढी : मौदा तालुक्यातील खात पंचायत समिती गणासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला. त्यात भारतीय जनता पक्षाचे मुकेश अग्रवाल यांनी शिवसेनेच्या भगवान डोकरीमारे यांचा ७१६ मतांनी पराभव केला.
खात पंचायत समिती गणाचे सदस्य प्रभाकर पटले यांनी राजीनामा दिल्याने सदर पोटनिवडणूक घेण्यात आली. पटले हे काँग्रेसचे एकमेव पंचायत समिती सदस्य होते. पोटनिवडणुकीत ही जागा भाजपने बळकावल्याने या पंचायत समितीतील काँग्रेस सदस्यसंख्या आता शून्य झाली आहे.
यावेळी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. लढत मात्र भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांत झाली. त्यात भाजपचे मुकेश अग्रवाल यांनी शिवसेनेचे भगवान डोकरीमारे यांना पराभूत केले. अग्रवाल यांना २४७७ तर डोकरीमारे यांना १७६१ मते मिळाली. काँग्रेसचे राजकुमार ठवकर यांना १५१७, बसपाचे लंकेश पटले यांना ६९१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरुषोत्तम शर्मा यांना केवळ ३३६ मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत एकूण ६८३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील ६७८२ मते वैध ठरविण्यात आली. शिवाय, ४९ मतदारांनी नोटाचा वापर केला. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शुक्रवारी सकाळी १० वाजता मौदा तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, दुपारी निवडणुकचा निकाल जाहीर होताच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
दरम्यान, ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करीत विजय मिरवणूक काढण्यात आली. यात भाजपचे विधानसभा क्षेत्र समन्वयक अशोक हटवार, सरपंच कैलास वैद्य, भोजराज भिवगडे, राजू मदनकर, जगदीश श्रावणकर, हेमंत भोंडके, सुशीला हिवसे, शिवदास मदनकर, संजय क्षीरसागर, नितेश पालटकर, माधव चौधरी, गंगाधर गावंडे, लच्छिराम क्षीरसागर, रवी कडव, विनोद भिवगडे, केशव तलमले, जगन गावंडे, सुनील ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
----

Web Title: 30 ... to eat ... election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.