जम्मू काश्मीरात सापडला 30 फूट लांब बोगदा

By admin | Published: March 4, 2016 02:27 PM2016-03-04T14:27:29+5:302016-03-04T14:27:29+5:30

30 फूट लांब आणि जमिनीखाली 10 फूट उंच बोगद्यातून घुसखोरी करुन मोठा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी केली जात असल्याची शंका बीएसएफ आयजी राकेश शर्मा यांनी व्यक्त केली आहे

30 feet long tunnel found in Jammu Kashmir | जम्मू काश्मीरात सापडला 30 फूट लांब बोगदा

जम्मू काश्मीरात सापडला 30 फूट लांब बोगदा

Next
ऑनलाइन लोकमत - 
श्रीनगर, दि. ४ - जम्मू काश्मीरमधील आर एस पुरा सेक्टरमध्ये सीमारेषेवर बोगदा आढळला आहे. या 30 फूट लांब आणि जमिनीखाली 10 फूट उंच बोगद्यातून घुसखोरी करुन मोठा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी केली जात असल्याची शंका बीएसएफ आयजी राकेश शर्मा यांनी व्यक्त केली आहे. बीएसएफ आयजी राकेश शर्मा यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्वत: जाऊन या ठिकाणाची पाहणी केली . 
पाकिस्तानातून खोदण्यात आलेल्या या बोगद्यामधून दहशतवाद्यांना जम्मूमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न असावा असं बीएसएफ आयजी राकेश शर्मा यांनी सांगितलं आहे. याप्रकणी सविस्तर चौकशी केली जाणार आहे, पाकिस्तानी रेंजर्सला याप्रकरणी माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सना पुढे येऊन तपास करण्यास सांगितलं आहे त्यांनी तसं आश्वासन दिलं आहे. त्यांना लवकरच हे सर्व पुरावे दिले जातील. आम्हाला आशा आहे ही के याप्रकरणी कारवाई करतील असं बीएसएफ आयजी राकेश शर्मा यांनी पाहणी केल्यानंतर सांगितलं आहे.
अशाप्रकारे पाकिस्तानच्या सीमारेषेवर बोगदा सापडण्याची ही पहिली घटना नाही आहे. 2012मध्येदेखील अशा प्रकारे सांबा सेक्टरमध्ये 400 मीटर लांबीचा बोगदा आढळला होता. तर 2009 मध्ये अखनूर सेक्टरमध्ये सीमारेषेजवळदेखील बोगदा आढळला होता. बीएसएफने याप्रकरणी पाकिस्तानकडे निषेध नोंदवला आहे. 
 

Web Title: 30 feet long tunnel found in Jammu Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.