पाऊण तास पावसाने झोडपले नवीपेठ जलमय : मेहरूण तलावाच्या जलसाठ्यात वाढ
By admin | Published: July 5, 2016 12:27 AM2016-07-05T00:27:57+5:302016-07-05T00:27:57+5:30
जळगाव : शहरात सोमवारी दुपारी जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला. यामुळे नवीपेठेतील मोठा भाग, मुख्य रस्ते जलमय झाले. बजरंग बोगदा भागात तर पूरस्थिती निर्माण झाली होती.
Next
ज गाव : शहरात सोमवारी दुपारी जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला. यामुळे नवीपेठेतील मोठा भाग, मुख्य रस्ते जलमय झाले. बजरंग बोगदा भागात तर पूरस्थिती निर्माण झाली होती. जवळपास अर्धा तास पाण्याचा निचरा न झाल्याने रस्ते जलमय झाले. नवीपेठेत जयप्रकाश नारायण चौकात मद्रास बेकरीसमोर एवढे पाणी साचले की दुचाकी, पादचारी यांना मार्ग बदलावा लागला. चारचाकी नेतानाही अडचण येत होती. अशीच स्थिती गोलाणी मार्केटनजीक शिरपूर बँकेशेजारील मुख्य रस्त्यावर झाली होती. तर गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदिरासमोर प्रचंड पाणी साचले. यामुळे फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या, दुकानांसमोर पाणीच पाणी झाले. ग्राहक, दुकानदारांना याचा मोठा त्रास झाला. दुपारी ३ वाजता सुमारे १५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. त्यानंतर ४.३० वाजता दमदार सरी कोसळू लागल्या. सायंकाळीदेखील अर्धा तास जोरदार पाऊस झाला. बजरंग पूलाखालील वाहतूक बंदजोरदार पावसामुळे बजरंग बोगद्यातून अधिक वेगाने पावसाचे पाणी वाहत होते. त्याची पातळी सतत वाढत होती. यामुळे या बोगद्याखालील वाहतूक बंद झाली. दुचाकी, रिक्षाचालक अशा सर्वांना पिंप्राळा रेल्वे गेट व गणेश कॉलनीमधून पुढे महामार्गावरून जावे लागले. स्टेडियमजवळ पाणीच पाणीस्टेडियम संकुलानजीक बसस्थानकाकडून येणार्या मुख्य रस्त्यावर प्रचंड पाणी साचले. गटारींमधून पाण्याचा निचरा होण्याची गती अतिशय कमी होती. त्यामुळे पाणी तुंबले होते. मेहरूण तलावात जलप्रवाहमेहरूण तलावामध्ये दक्षिण दिशेकडील स्त्रोतांमधून मोठ्या प्रमाणात जलप्रवाह सुरू झाला. यामुळे तलावाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक नागरिक, युवक मेहरूण तलावावर आले होते. तर अनेकांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला.