वैद्यकीय प्रवेशासाठी ३० लाखांची फसवणूक

By admin | Published: September 30, 2015 02:17 AM2015-09-30T02:17:43+5:302015-09-30T02:17:43+5:30

विखे फाउंडेशनच्या येथील वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देण्याचे आमिष दाखवून एकाची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

30 lakh fraud for medical admission | वैद्यकीय प्रवेशासाठी ३० लाखांची फसवणूक

वैद्यकीय प्रवेशासाठी ३० लाखांची फसवणूक

Next

अहमदनगर : विखे फाउंडेशनच्या येथील वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश
देण्याचे आमिष दाखवून एकाची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बनावट प्रवेशपत्र बनवल्याचाही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सौरभ सिन्हा आणि मार्तंडे (पूर्ण नाव नाही़) यांनी बनावट प्रवेशपत्र तयार केले. ते दाखवून मुलाचा प्रवेश निश्चित झाल्याचे दोघांनी योगेश चंद्रहनुमान प्रसाद सैनी (५०, वैद्यकीय व्यावसायिक, रा. टोडापूर वार्ड, गुडगाव, हरियाणा) यांना सांगितले. प्रवेशपत्र घेण्यासाठी सैनी यांना महाविद्यालयाच्या परिसरात बोलावले व त्यांच्याकडून ३५ लाख रुपये घेतले. मात्र सैनी महाविद्यालयात गेल्यानंतर प्रवेशपत्र बनावट असून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सैनी यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
--------------
तोच ‘सौरभ’
आॅगस्टमध्ये लोणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एकाची फसवणूक झाली होती. त्यातही आरोपीचे नाव ‘सौरभ’ असेच होते. त्यावरून वैद्यकीय महाविद्यालयाचे बनावट प्रवेशपत्र तयार करून पालकांना लुटणारी परप्रांतीय टोळीच कार्यरत असल्याची शक्यता आहे. मात्र फिर्यादीसह आरोपीही परप्रांतीय असल्याने गुन्ह्याचा तपास वेगाने होताना दिसत नाही.

Web Title: 30 lakh fraud for medical admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.