३० हजार लोकांच्या नोक-या धोक्यात; कमी वेतनावर रोजगार शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:42 AM2017-11-04T02:42:42+5:302017-11-04T02:43:04+5:30
दूरसंचार क्षेत्र कठीण परिस्थितीतून जात असून, एकीकरण प्रक्रियेत किमान ३० हजार लोकांच्या नोक-या जाण्याचा धोका आहे. बेरोजगार संभाव्य उमेदवारांना पर्यायी नोक-या उपलब्ध असल्या, तरी त्यांना कमी वेतनावर समझोता करावा लागेल, तसेच नवीन तंत्रज्ञानही आत्मसात करावे लागेल.
बंगळुरू/नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्र कठीण परिस्थितीतून जात असून, एकीकरण प्रक्रियेत किमान ३० हजार लोकांच्या नोक-या जाण्याचा धोका आहे. बेरोजगार संभाव्य उमेदवारांना पर्यायी नोक-या उपलब्ध असल्या, तरी त्यांना कमी वेतनावर समझोता करावा लागेल, तसेच नवीन तंत्रज्ञानही आत्मसात करावे लागेल.
टीमलीज सर्व्हिसेस, मॅनपॉवर ग्रुप सर्व्हिसेस, एबीसी कन्सल्टंट्स, रँडस्टँड इंडिया आणि कोर्न फेरी यांनी ही माहिती दिली. जिओच्या आगमनानंतर दूरसंचार क्षेत्रातील परिस्थिती बदलली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सने वायरलेस व्यवसाय बंद केला आहे. टाटा समूहाने व्यवसाय भारती एअरटेलला विकला आहे. या प्रक्रियेत १२ महिन्यांत २० हजार ते ३० हजार लोकांना रोजगार गमवावा लागेल.
टीमलीज सर्व्हिसेसचे रितूपर्ण चक्रवर्ती यांनी सांगितले की, जे लोक पायाभूत सेवा व नेटवर्किंग इंजिनीअरिंग, विक्री व वितरण, दूरसंचार अभियांत्रिकी, एचआर, वित्त, कॉल सेंटर आणि अन्य सहायक क्षेत्रात काम करीत आहेत, त्यांच्या नोकºयांना धोका आहे. दूरसंचार क्षेत्रावर तब्बल ८ लाख कोटींच्या कर्जाचा बोजा आहे.
एबीसी कन्सल्टंट्सचे विवेक मेहता म्हणाले की, एकीकरण प्रक्रिया व खर्चकपात यात रोजगाराचा बळी जाणार आहे. मध्यम ते वरिष्ठ व्यवस्थापकांच्या नोकºयांना अधिक धोका आहे.
कोर्न फेरी इंडियाचे गौरव बर्मन यांनी सांगितले की, दूरसंचार उद्योग सॉफ्टवेअर आधारित नेटवर्क व इन्फ्रास्ट्रक्चरच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेस तसेच विक्री व वितरण या विभागातील नोकºयांत कपात होईल. (वृत्तसंस्था)
मोठा पगार घेणारे संकटात
मॅनपॉवर ग्रुप सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक ए. जी. राव यांनी सांगितले की, ४० हजार ते काही लाख इतके वेतन घेणाºया तंत्रज्ञ आणि अभियंत्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळू शकते. नोकºया टिकविण्यासाठी अथवा नव्या नोकºया मिळविण्यासाठी या लोकांना नवीन कौशल्ये शिकावी लागतील.