बापरे! सप्तपदी घेत असतानाच नवरदेव खाली कोसळला; 30 वर्षीय डॉक्टरचा हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 02:20 PM2023-02-11T14:20:24+5:302023-02-11T14:27:02+5:30
लग्न मंडपात सप्तपदी सुरू असताना एका डॉक्टरचा अचानक मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशच्या अल्मोडा जिल्ह्यातील गावात एका डॉक्टरच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न मंडपात सप्तपदी सुरू असताना एका डॉक्टरचा अचानक मृत्यू झाला. डॉक्टरांच्या छातीत अचानक दुखू लागले आणि चक्कर आल्याने तो खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
समीर उपाध्याय असं या डॉक्टरचं नाव असून तो मॅट्रिक्स हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट होता. शुक्रवारी त्याच्या लग्नाची वरात निघाली. सप्तपदी घेण्यापूर्वी समीर उपाध्याय याची प्रकृती ठीक होती. मात्र, अचानक त्या़च्या छातीत दुखू लागले. डॉक्टर वराच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. डॉक्टरचं वय 30 वर्ष होते. डॉ. समीरच्या निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी हल्द्वानीच्या घरी संगीत आणि पार्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, परंतु मुलाच्या मृत्यूमुळे सर्व काही अपूर्ण राहिले. डॉ. समीरला दोन बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. तर धाकटी बहीण डॉक्टर आहे. त्याचे वडील काही काळापूर्वी ओमानहून परतले आहेत. मात्र त्यांची प्रकृती बरी नाही. मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांनी आधार गमावला आहे.
डॉक्टरचा मृतदेह शनिवारी सकाळी घरी आणण्यात आला. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मॅट्रिक्स हॉस्पिटलचे संचालक आणि हल्द्वानी शहरातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रदीप पांडे सांगतात की, याआधीही डॉ. समीरने त्याच्या तब्येतीची तक्रार केली नव्हती. या वयात हृदयविकाराचा झटका का आला हा संशोधनाचा विषय आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"