धक्कादायक! गाण्यांवर ठेका धरला अन् नाचताना अचानक कोसळला; तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 03:18 PM2023-03-10T15:18:18+5:302023-03-10T15:19:09+5:30

विनीतने घरी येऊन आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर गाण्यांच्या तालावर नाचत असलेल्या कुटुंबीयांसह स्वतःही नाचू लागला.

30 year old man dies heart attack while dancing | धक्कादायक! गाण्यांवर ठेका धरला अन् नाचताना अचानक कोसळला; तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

धक्कादायक! गाण्यांवर ठेका धरला अन् नाचताना अचानक कोसळला; तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मोदीनगर पोलीस स्टेशन हद्दीत नाचत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. 30 वर्षीय व्यक्ती आपल्या आई-वडील आणि पुतण्यासोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीहून मोदीनगरला आला होता. त्याचवेळी घरातील सर्व सदस्य गाण्याच्या तालावर नाचत होते. हा तरुणही सर्वांसोबत नाचत होता आणि त्याचवेळी नाचत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विनीत कश्यप नावाचा हा तरुण दिल्लीतील एका फोटोग्राफरच्या दुकानात काम करायचा आणि होळीच्या दिवशी तो मोदीनगर येथे आई-वडील आणि इतर कुटुंबीयांना भेटण्यासाठी आला होता. होळीच्या निमित्ताने सर्वजण आनंदाने नाचत होते. विनीतही खूप खूश दिसत होता. विनीतने घरी येऊन आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर गाण्यांच्या तालावर नाचत असलेल्या कुटुंबीयांसह स्वतःही नाचू लागला.

जेव्हा सगळे गाण्यांच्या तालावर नाचत होते. त्याचवेळी नाचत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला घरातील लोकांना वाटले की विनीत डान्स स्टेप करताना नवीन डान्स स्टेप दाखवत आहे आणि त्यात तो डान्स करताना खाली पडत आहे, पण काही वेळ तो जमिनीवर पडून राहिल्याचं घरच्यांना दिसतं. तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला तातडीने उचलून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासाअंती विनीतला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. तर दुसरीकडे विनीतच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना मिळताच घरात होळीच्या आनंदाऐवजी शोककळा पसरली. घरातील सर्वांनाच धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 30 year old man dies heart attack while dancing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.